मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी राजस्थान उच्च न्यायालयाकडून दिलासादायक बातमी आहे. सलमान खानने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने मान्य केली आहे. यानंतर आता उच्च न्यायालयात सगळ्या प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सलमान खानला पुन्हा-पुन्हा हजर राहावं लागणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणीवेळी सलमानची बहीण अलविरा होती हजर 
सलमान खानच्या वकिलाने सोमवारी हायकोर्टात आपली संपूर्ण बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. या सुनावणीदरम्यान सलमान खानची बहीण अलविरा न्यायालयात उपस्थित होती. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण काळविटाच्या अवैध शिकारीशी संबंधित आहे.


मथानिया आणि भवाद ईथे दोन काळविट शिकार केल्याप्रकरणी त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. त्याचबरोबर जोधपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने कांकणीमध्ये काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरवलं. परवाना संपल्यानंतरही 32 आणि 22 बोअरच्या रायफल ठेवल्या प्रकरणी. चौथा गुन्हा शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला. याप्रकरणी सलमान खानला शिक्षाही झाली होती.



कांकणी गावाच्या हद्दीत दोन  काळविटांची शिकार केल्याप्रकरणी सलमान खानला ट्रायल कोर्टाने दोषी ठरवून ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणी सलमान खानलाही अटक करण्यात आली आहे. सध्या हा अभिनेता जामिनावर बाहेर आहे.