मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात जास्त वादग्रस्त शो 'बिग बॉस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वाद, मैत्री, प्रेम इत्यादी भावनांनी भरलेला या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री होत आहे. गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस 15'च्या घरात एका प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगत होती. टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली 'बिग बॉस'च्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस'च्या घरात नक्की कोण येणार आहेत, त्यांची नावेसमोर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार जय भानुशालीने घरात एन्ट्री घेतली आहे. 'आम्ही काही प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या प्रतीक्षेत होतो. जेव्हा स्पर्धकाला घरात प्रवेश करायचा होता, तेव्हा एक दिवस आधी जय भानुशालीसोबत करार पक्का झाला...' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वादग्रस्त घरात जयला पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 



'बिग बॉस 15' मध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, विधी पांड्या, डोनल बिष्ट, अकासा सिंह, सिंबा नागपाल, उमर रियाज, साहिल श्रॉफ, ईशान सहगल, विशाल कोतिया आणि मीशा अय्यर आहेत. त्यांच्या शिवाय 'बिग बॉस ओटीटी' मधील शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहपाल देखील शोमध्ये दिसणार आहेत.


जयच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याने 'कसौटी जिंदगी की', 'कयामत', 'कुमकुम', आणि 'किस देश में है मेरा दिल' यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्याने रियलिटी शो 'झलक दिखला जा 2', 'कौन जीतेगा बॉलीवुड का टिकट', 'इस जंगल से मुझे बचाओ' आणि 'खतरों के खिलाड़ी 7' मध्ये स्वतःचा जलवा दाखवला आहे.