अंकिता लोखंडेच्या आयुष्यात मोठं वादळ; पती विकी आणि अभिनेत्रीत वाद
टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो `बिग बॉस 17` नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलेब्स अनेकदा भांडताना दिसतात. टीव्ही स्टार अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत शोमध्ये दिसत आहे. अंकिता आणि विकी या शोमध्ये आल्यापासून चर्चेत आहेत.
मुंबई : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलेब्स अनेकदा भांडताना दिसतात. टीव्ही स्टार अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत शोमध्ये दिसत आहे. अंकिता आणि विकी या शोमध्ये आल्यापासून चर्चेत आहेत. अंकिता अनेकदा विकीची तक्रार करताना दिसते. आता सोमवारच्या एपिसोडमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये दोघंही खेळावर चर्चा करत होते आणि अचानक यांच्यात वाद सुरु झाला.
एपिसोडमध्ये अंकिता आणि विकी बेडवर झोपलेले दिसत आहेत आणि एकमेकांशी बोलत आहेत. अंकिता विकीला सांगते की, तो गेम खूप चांगला खेळत आहे पण तो तिला खेळात साथ देत नाही आणि तिला एकटेपणा वाटत आहे.
'मी तुझा गुलाम नाही'
अंकिताचं हे बोलणं ऐकून विकी चिडतो आणि म्हणतो, मी तुझा गुलाम नाही आणि माझ्या इच्छेनुसार गेम खेळेन. यानंत विकी खूप चिडतो आणि म्हणतो, आपण असं करुया की आपण एकमेकांशी बोलूया नको आणि एकमेकांपासून दूर राहूया. विकीचं बोलणं ऐकून अंकिता रडू लागते.
आयुष्यात एक खडतर पॅच होता.
विकी अंकिताला त्याच्याशी प्रेमाने आणि आदराने बोलण्यास सांगतो कारण त्याने नेहमीच तिला पाठिंबा दिला आहे एवढंच नाही तर तो तिचा गुलाम नाही. असंही म्हणतो. विकी पुढे सांगतो की, तिच्या आयुष्यात एक टफ-पॅच होता ज्यामध्ये त्याने तिला खूप साथ दिली. इतकंच नाही तर विक्की अंकिताला सांगतो की तो खेळासाठी काहीही करायला मोकळा आहे. त्यानंतर अंकिता रडायला लागते आणि म्हणते की ती घरात राहू शकत नाही. एकीकडे अंकिता आणि विकी शोमध्ये भांडताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काहीजण मुनव्वर फारुकी आणि मन्नारा चोप्राला त्यांच्या मैत्रीसाठी चिडवताना दिसत आहेत.