मुंबई : 'बिग बॉस 15' च्या विजेतीने रातोरात प्रसिद्धी मिळवली आहे. . आपल्या जबरस्त अंदाजाने तिने लोकांना आपल्या प्रेमात पाडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेजस्वी प्रकाशने बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासूनच तिच्या करण कुंद्रोसोबतच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. करण कुंद्रासोबतची तिची वाढती जवळीक लोकांचे लक्ष वेधून घेत होती. आजही चाहत्यांना तेजस्वी आणि करण यांना एकत्र पाहायला आवडते.


दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने सिंदूर लावलं दिसत आहे.तेजस्वी प्रकाशने एकता कपूरच्या सुपरहिट शो 'नागिन 6' मध्ये लग्न केले आहे. तेजस्वी नुकतीच मालिकेच्या सेटवर दिसली होती.ती अगदी नवीन नवरी प्रमाणे दिसत होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'नागिन 6' च्या सेटवर एक नवीन नवरी आली होती. तेजस्वी प्रकाश सेटवर पांढऱ्या रंगाच्या सुंदर लेहेंग्यात दिसली. ज्यासोबत तेजस्वीने सिंदूर लावलं होतं.


व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे करण आणि तेजस्वीचं लग्न झाल्याचं चाहत्यांनाही वाटू लागलं.


तेजस्वी प्रकाशला नववधूच्या लूकमध्ये पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली. तेजस्वी प्रकाशच्या व्हिडिओवर चाहते सतत मिसेस कुंद्रा अशी कमेंट करत आहेत.


दुसरीकडे, मीडियासमोर करण कुंद्राचे नाव ऐकून तेजस्वी लाजली. तेजस्वी प्रकाशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.