मुंबई : नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या Class of 83 सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या सिनेमातून अभिनेता बॉबी देओल IPS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील ५ पोलीस अधिकाऱ्यांची गोष्ट या सिनेमातून मांडली आहे. हे पाचही अधिकारी १९८३ बॅचमधील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८३ च्या या अधिकाऱ्यांच्या बॅचने मुंबईतील माफियांच केलेलं एन्काऊंटर हे चर्चेचा विषय आहे. तोच काळ या सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा २१ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. 



बॉबी देओलने या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माता आणि दिग्दर्शक ओटीटी प्लॅटफॉर्मवरच सिनेमे रिलीज करणं योग्य समजतात. 


या सिनेमात बॉबी देओलसोबतच श्रेया सरन, प्रियांशु चटर्जी, अमृता पुरी, पुलकित सम्राट, अनूप सोनी आणि पृथ्वीक प्रताप मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अतुल सबरवालने केलं असून हा सिनेमा सैय्यद युनुस हुसैन जैदी यांच्या 'क्लास ऑफ ८३' या पुस्तकावर आधारित आहे. 


'क्लास ऑफ ८३' हा सिनेमा शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीचा आहे. या कंपनीने अगोदर दोन वेब सीरिज तयार केल्या आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' आणि 'बेताल' अशी नावे आहेत.