मुंबई : 'बेताल पचीसी', 'चंद्रकांता', 'युग', 'द सोर्ड  ऑफ  टीपू सुल्तान' आणि 'सलीम अनारकली' या टीव्ही शोच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता शहबाज खानवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. एका महिलेने त्याच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईच्या ओशिवारा पोलीस स्थानकात महिलेने गुन्हा दाखल केला. एएनआयच्या वृत्तानुसार हे प्रकरण एफआरआर कलम ३५४ आणि ५०९ अन्वये नोंदविण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर शहबाजने याप्रकरणी कोणतेही भाष्य केलेले नाही. 



शहबाज हा कलाविश्वातील अत्यंत प्रसिद्ध चेहरा आहे. ९०च्या दशकात त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केले. त्याचप्रमाणे अधिक चित्रपटांमध्ये त्याने खलनायकाची भूमिका देखील साकारली आहे. 


अभिनेता सलमान खानच्या 'वीर' चित्रपटात देखील तो झळकला होता. त्याचप्रमाणे 'एजेन्ट विनोद', 'द हीरो' या चित्रपटांमध्ये देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. 


मध्य प्रदेशमध्ये राहणारे शहबाज खान पद्मभूषण उस्ताद अमीर खान यांचे पुत्र आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय गायकांच्या यादीमध्ये अमिर खान यांचे नाव आहे. त्यांनी इंदौर घराण्याची स्थापना केली होती.