केव्हा एकेकाळी बिग बींनी `हे` कामही केलंय; पाहून बसेल धक्का
बिग बींनी रुपेरी पडदा गाजवण्यापूर्वी आणि तो गाजवत असतानाही अनेक अनपेक्षित कामांमध्ये योगदान दिलं
मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये गेली कित्येक दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी कायमच स्वत:साठीच काही आव्हानं आखली आणि त्या आव्हानांचा सामना करत त्यांनी प्रवास पुढे सुरु ठेवला. प्रेक्षकांच्या मनाचा अचूक ठाव घेत त्यांनी अनेक पात्र रुपेरी पडद्यावर जीवंत केली. पण, तुम्हाला माहितीये का, बिग बींनी रुपेरी पडदा गाजवण्यापूर्वी आणि तो गाजवत असतानाही अनेक अनपेक्षित कामांमध्ये योगदान दिलं होतं.
'काला पत्थर' या चित्रपटाला 42 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या पहिल्या नोकरीचा उल्लेख केला. शिवाय एकेकाळी आपण कोळशाच्या खाणीत काम केल्याचंही त्यांनी सांगितलं.
कलकत्ता कंपनीमध्ये काम केल्याच्या अनुभवाशी त्यांनी चित्रपटासाठी काम करतानाटे अनुभव जोडले. कोळशा विभागामध्ये आपण नोकरी केल्याचा खुलासा त्यांनी केला. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी आसनसोल आणि धनबाद येथील कोळशांच्या खाणीत आपण नोकरीला होतो, असं त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. त्यांची ही पोस्ट आणि नोकरीबाबतचा हा खुलासा अनेकांनाच धक्काही देऊन गेली.
दरम्यान, 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'काला पत्थर' या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार, राखी, परवीन बाबी, नीतू सिंह, प्रेम चोप्रा हे सर्व कलाकारही झळकले होते. यश चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.