Govinda on Esmayeel​ Shroff Death: सिनेमात जगतातून अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक इस्माइल श्रॉफ (Esmayeel shroff) यांचे बुधवारी निधन झाले आहे. ते कोकिलाबेन रूग्णालयात एडमिट (Kokilaben hospital) होते. ते 62 वर्षांचे होते. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना 29 ऑगस्ट रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हा त्यांना तातडीनं कोकिलाबेन रूग्णालयात एडमिट करण्यात आले होते. (bollywood actor govina mourns the death of famous director and his mentor Esmayeel shroff)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या निधनावर बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी शोक व्यक्त केला आहे. इस्माईल श्रॉफ हे आंध्रप्रदेश येथील रहिवासी होते. त्यांचे बालपण आंद्रप्रदेशातच गेले. त्यानंतर ते मुंबईत आले आणि 1980 ते 1990 दरम्यान त्यांनी उत्तोमोत्तम चित्रपटांची निर्मिती केली. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


इस्माइल श्रॉफ यांच्या निधनावर गोंविदाचा शोक - नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदानं इस्माइल श्रॉफ यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ज्यांनी मला गोविंदा बनवलं तेच या जगात नाहीत. माझ्या फिल्मी करिअरला पुढे करण्यात त्याचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. (Who named Govinda) त्याच्यासोबतच मी माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांनी मला फक्त कामच दिले नाही तर त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि माझ्या सिनेमाची आवडही जपली होती. गोविंदाने 1986 मध्ये इस्माईल श्रॉफ दिग्दर्शित 'लव्ह 86' (Love 86) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.