Saba Azad and Hrithik Roshan : वैवाहिक नात्यातून विभक्त झाल्यानंतर अनेक वर्षांनी अभिनेता हृतिक रोशन याला प्रेमाचं, हक्काचं माणूस भेटलं. हे हक्काचं माणूस म्हणजे, अभिनेत्री, गायिका सबा आझाद. सुरुवातीला गुलदस्त्यात असणारं हृतिक आणि सबाचं नातं आता सर्वज्ञात झालं आहे. बी टाऊनमध्ये आयोजित केले जाणारे कार्यक्रम म्हणू नका किंवा मग घरच्या घरी एखादं गेट टुगेदर म्हणू नका हृतिक तिथे सबा दिसलीच म्हणून समजा. अभिनेत्याच्या कुटुंबासोबतही चांगल्याच रुळलेल्या सबानं जणू त्याच्यावर जादूच केली आहे. खरं वाटत नाहीये? (Bollywood) बॉलिवूडच्या या हँडसम अभिनेत्याचा व्हायरल होणारा फोटो तुम्ही पाहिला का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच, NMACC अर्थात नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमांच्या निमित्तानं या बहुचर्चित जोडीनंही हजेरी लावली होती. कलाकारांची गर्दी असताना हृतिक आणि सबाच्या केमिस्ट्रीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. 


NMACC मध्ये दुसऱ्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी सबानं सुरेख लूक केला होता. यावेळी तिनं अमित अग्रवालनं डिझाईन केलेला कस्टम मेड साडी गाऊन घातला होता. भारतीय कापड उद्योग आणि कलाकुसरीला इथं तिनं अधोरेखित करण्याचा निर्णय घेत फॅशनची साथही सोडली नव्हती. तर, हृतिकनं यावेळी काळ्या रंगाचं जॅकेट आणि त्याला साजेशी ट्राऊजर घालत क्लासिक लूकला पसंती दिली होती. 


सबासाठी काहीपण... 


हृतिक आणि सबा या कार्यक्रमासाठी आले आणि त्यांची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी घाई केली. या सोहळ्याला आलं असता ही जोडी अनेक कलाकार मित्रांना भेटली, अमाप गप्पाही झाल्या. याच क्षणांचे फोटो सबाचा डिझायनर अमित अग्रवाल यानं सोशल मीडियावर शेअरही केले. जिथं त्यानं तिचा लूक नेमका कसा डिझाईन केला याचीही झलक दाखवली. 


हेसुद्धा वाचा : NMACC Launch: अंबानींच्या पार्टीत डिनर टेबलवर 500 च्या नोटा? काय आहे नेमका प्रकार?


 


अमितनं शेअर केलेले फोटो खास होते खरे. पण, त्यातील एका फोटोमध्ये अमित आणि सबापेक्षा जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे पाठीमागे एका बाजूला उभं राहून कुणाशीतरी बोलणाऱ्या हृतिक रोशननं. हृतिकनं इथं हातात सबाचे सँडल्स पकडले होते. कुतूहल म्हणून नेटकऱ्यांचं लक्ष गेलं सबाच्या पायांकडे, तर ती तिथं अनवाणीच उभी होती.



प्रेयसीसाठी काहीही... असंच काहीसं म्हणत हृतिकनं सबाच्या सँडल्स हातात पडकल्या. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकजण या गोड नात्याचं आणि विशेष म्हणजे हृतिकचं कौतुक करताना दिसत आहेत.