मुंबई : कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे लोकं घरी असल्यामुळे आपल्या जवळच्या मंडळींची भेट घेणं देखील अशक्य झालं आहे. अशावेळी बॉलिवूड कलाकारावर मातृशोक कोसळला आहे. पण अशा परिस्थितीत त्याला आईचं शेवटचं दर्शन देखील घेता आलं नसून व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता इरफान खानची आई सईदा बेगम यांच शनिवारी निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी इरफान खानच्या आईने अखेरचा श्वास घेतला. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे इरफान आपल्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकला नाही. एवढंच नव्हे तर इरफानने आपल्या आईचं शेवटचं दर्शन हे व्हिडिओ कॉलद्वारे घेतलं. 


इरफान खानची आई अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास जयपुरच्या आपल्या घरी घेतला. दिग्दर्शक शूजित यांनी ही माहिती दिली. हे दोघं एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहेत. पिकू सिनेमात दोघांनी एकत्र काम केलंय. पीकू या सिनेमाचं दिग्दर्शन शूजिक सरकार यांनी केलंय. 


इरफान खान अनेक दिवसांपासून आजारी आहे. २०१७ मध्ये जूनपासून इरफान उपचार घेण्याकरता परदेशात गेला होता. इरफान खानला कॅन्सर झाल्याच त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना सांगितलं होतं. 'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये आला.