ये बाबूराव का स्टाईल है`, आपल्या `या` ७ पात्रांमुळे परेश रावल यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
`या` ७ पात्रांमुळे परेश रावल आज स्टार या यादीत मोडतात...
मुंबई : बाबू भैय्या, लोंबोदर चाचा, कांजीलाल मेहता, टिक्कू सारख्या उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेता परेश रावल प्रसिद्ध आहेत. या पात्रांच्या नावांचा अंदाज लावणं सोपं आहे. या ७ पात्रांमुळे परेश रावल आज स्टार या यादीत मोडतात. नजर टाकुयात त्या ७ पात्रांवर जी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत
बाबूराव गणपतराव आपटे उर्फ बाबू
'हेरा फेरी' चित्रपटाचं एक असं विनोदी पात्र, ज्या स्टाईलचं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटातमध्ये कॉमेडी टायमिंगबद्दल आजही परेश रावल यांचं कौतुक केलं जातं
श्याम गोपाल बजाज आणि राम गोपाल बजाज
'अंदाज अपना अपना' हा सिनेमा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो. 'तेजा मैं हूं, मार्क इधर है' परेश यांचा हा डायलॉग आहे जो खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात ते डबल रोलमध्ये दिसले आहेत.
लंबोदर चाचा
'अतीथी तुम कब जाओगे' या चित्रपटामध्ये हल्क्या -फुल्क्या अंदाजात महानगरीतील जीवनात पाहुणे यायची आवहान दाखवलं आहे. चित्रपटात लंबोदर काका बनलेल्या परेश रावल यांनी सर्वांना पोटधरुन हसायला भाग पाडलं.
हंसमुखलाल
'जुदाई' चित्रपटांमध्ये प्रत्येकवेळी प्रश्नाची पेटी घेवुन उभे असलेल्या हंसमुखलालने या ड्रामा चित्रपटामध्ये विनोदाचा तडका दिला होता. या चित्रपटात त्याच्या लूकवरही बरीच मेहनत घेतली गेली होती.
कांजी लालजी मेहता
परेश रावल यांनी या चित्रपटात नास्तिकाची भूमिका साकारली होती आणि ही भूमिका त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक मानली जाते. कानजी भाई सोसायटीमध्ये धर्म आणि समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा यावर प्रश्नचिन्ह उभे करतात.
हरि लाल गोडसले
आपल्याला चाची-४२० हा चित्रपट नक्कीच आठवत असेल, कमल हासनने या चित्रपटात 'चाची' बनुन खूप हसवलं, तर परेश रावल आपल्या हरिलालच्या भूमिकेसाठीही खूप चर्चेत होते. या चित्रपटात हरीलाल बनावट काकूंच्या प्रेमात पडतात.
टिक्कू
दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या चित्रपटामध्ये परेशने एका किन्नरची भूमिका साकारली होती. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित होता. परेशच्या या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.