Ranveer Singh Viral Video: नुकताच रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे (Bold Photoshoot) चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा रणवीर सिंग चर्चत आला आहे. साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स 2022 (South Indian Internation Award 2022) हा पुरस्कार सोहळा बंगलोर येथे पार पडला. अल्लू अर्जून, विजय देवरकोंडा, कमल हसन असे साऊथ इंडिस्ट्रीतील दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. (bollywood actor ranveer singh acciently gets hit on face by a person in a award show video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा या सोहळ्याला रणवीर सिंगही उपस्थित होता. त्याला या पुरस्कार सोहळ्यादरम्यान विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. परंतु या आनंदोत्सवादरम्यान रणवीरसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. रणवीर सिंगसोबत सेल्फी काढण्यासाठी त्याच्याभोवती अनेक चाहते गोळा झाले होते. रणवीरला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. 


या प्रसंगी तेवढ्यात गर्दीतून एक हात बाहेर आला आणि तो चक्क रणवीरच्या गालावर जोरात बसला. जवळ जवळ त्याला चापटी बसली. त्याला थोडीशी दुखापतही झाली कारण दोन मिनिटांसाठी रणवीर स्तब्ध झाला होता. असा प्रकार घडला तरी रणवीर पुन्हा एकदा हसतमुख आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढत होतो. 



हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकताच रणवीरला फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला आहे. रणवीर लवकरच सर्कस आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.