मुंबई : 'काबील बनो... कामयाबी तो झक मारके तुम्हारे पिछे आएगी...' हे वाक्य अभिनेता आमिर खान याच्या चित्रपटातून आपल्या भेटीला आलं आणि ते लगेचच पटलंही. मेहनत करा, फळ मिळणारच... प्रयत्नांना एक ना एक दिवस यश येणारच असाच संदेश या डायलॉगनं दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानकच या डायलॉगची आठवण होण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी असाच धडा शिकवण्यासाठी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आपल्या मुलाला वास्तवाची ओळख करून दिली. 


आपण प्रसिद्ध असलो तरीही मुलाला या प्रसिद्धीची, पैसा आणि श्रीमंतीची सवय होऊ नये... यासाठीच त्या अभिनेत्यानं हा निर्णय घेतला होता. म्हणूनच की काय त्यानं लेकाला स्वत:च्याच कारमध्ये बसण्याही मज्जाव केला. 


या अभिनेत्याचं नाव सुनील दत्त आणि त्यांचा मुलगा म्हणजे अभिनेता संजय दत्त  (Sanjay Dutt). 'रॉकी', 'साजन', 'खलनायक', आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' अशा चित्रपटांतून संजूबाबानं बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान मिळवलं. 


इथवरचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. कारण, तो कळता झाला तेव्हा खुद्द वडील सुनील दत्त यांनीच आपल्या या लेकाला परिस्थितीची जाणीव करण्यासाठी कठोर निर्णय घेतला होता. संजूबाबानंच यासंबंधीची एक आठवण शेअर केली. 


काय म्हणाला संजय दत्त? 
'महाविद्यालयाचा पहिलाच दिवस होता. मी विचार केला की आज कारनं जाईन. पण, वडिलांनी मला जवळ बोलावलं आणि वांद्रे स्थानकातून सुरु होणाऱ्या रेल्वेचा सेकंड क्लासचा एक पास हातात दिला. म्हणाले, टॅक्सी किंवा ऑटोनं स्टेशनला जा. मी जेव्हा त्यांच्याकडे कार मागितली तेव्हा, तू जेव्हा कमावशील तेव्हाच कारमध्ये बस असं त्यांनी सांगितलं', ही आठवण त्यानं सांगितली. 



गरजेनुसारच मागण्या पूर्ण होत होत्या... 
सुनील दत्त (Sunil Dutt) आणि नरगिस (Nargis) यांचा मुलगा संजय दत्तच्या तितक्याच मागण्या पूर्ण केल्या जात होत्या, ज्यांची मागणी केली जात होती. घरातल्या मदतनीसांनाही आदर दिलाच पाहिजे अशीच शिकवण संजूबाबाला बालवयातूनच मिळाली होती. 



आपण नर्गिस आणि सुनील दत्त या सेलिब्रिटींची मुलं आहोत याची हवाही डोक्यात जाऊ न दिल्याचं सांगत आपल्या जीवनातील वडिलांचं आणि आईचं स्थान संजूबाबानं अधोरेखित करत हे सुरेख नातं समोर ठेवलं.