T20 World Cup 2024 : कोण आहे अक्षर पटेलची लाइफ पार्टनर? रील्सने सोशल मीडियावर घालते धुमाकूळ, आहारतज्ज्ञ मेहासोबत अशी आहे लव्ह स्टोरी

Axar Patel Wife Meha : भारताने टी - 20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत 2022 चा वचपा काढलाय. यात अक्षय पटेल या खेळाडूने टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केलीय. बॅटिंग असो किंवा बॉलिंग त्यांनी उत्कृष्ट खेळी खेळली आहे. त्याचा यशामध्ये पत्नी मेहाचं मोठं योगदान आहे.

Jun 28, 2024, 13:12 PM IST
1/7

गेल्या वर्षी गुजरातमधील वडोदरा इथे अक्षय पटेल यांने मैत्रिण मेहा पटेलशी लग्न केलं. मेहा ही एक आहारतज्ज्ञ असून पोषणतज्ज्ञ देखील आहे. त्यामुळे अक्षयच्या यशात तिचही योगदान आहे. 

2/7

मैदानात अक्षयला उच्च शारीरिक स्थिती राखण्यासाठी मेहा मदत करते. त्याच्या आहारावर त्याच विशेष लक्ष असतं. 

3/7

मेहा ही सोशल मीडियावर सक्रीय असून तिच्या रिल्समधून ती धुमाकूळ घालते. ती नेटकऱ्यांना आरोग्य तपा आणि निरोगी राहण्यासाठी प्रोत्साहन देते. 

4/7

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 70 हजार फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनचे व्हिडीओ शेअर करत असते. 

5/7

अक्षर क्रिकेट आणि ब्रँड्सशी सहयोगातून भरपूर कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती ही 49 कोटी आहे, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. 

6/7

अक्षरने 2011 मध्ये अक्षरला प्रपोज केल्यानंतर 10 वर्षांनी मेहाशी लग्न केलं. बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर 28व्या वाढदिवशी अक्षरने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मेहाला प्रपोज केलं होतं. 

7/7

पण त्यांनी घाई न करता 11 वर्षांनी लग्न केलं. दरम्यान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षरने अप्रतिम कामगिरी केलीय.