मुंबई : Citizenship Amendment Act नागरिकता सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन देशभरातील काही भागामध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या कायद्याचा विरोध करत अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. ज्यामध्ये देशातील एका महत्त्वाच्या विद्यापीठापैकी एक अशा जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही या कायद्याचा विरोध केला आहे. जनसामान्य, विद्यार्थी यांच्यासोबतच आता सेलिब्रिटी मंडळीसुद्धा या मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. ज्यामध्ये पोलीस यंत्रणा या आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी काही कठोर पावलंही उचलताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे संपूर्ण देशभरात जामिया मुद्द्याची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे जामियाचा माजी विद्यार्थी आणि अभिनेता शाहरुख खान याचं या सर्व प्रकरणी मौन बाळगणं हे अनेकांना रुचलेलं नाही. परिणामी एका चाहत्याने ट्विट करत शाहरुखला उद्देशून त्याला एक विनवणी केली आहे. सोशल मीडियावर सध्याच्या घडीला हे ट्विट कमालीचं व्हायरल होत आहे. 



शाहरुख तुम्ही जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहात. त्यामुळे या मुद्द्यावर तुमचं असं शांत राहणं चिंतेत टाकणारं आहे. तेव्हा आता तुमची जादू दाखवाच. आता ती वेळ आलीच आहे.....', असं म्हणत शाहरुखने या मुद्द्यावर काहीतरी करावं अशी सादच त्याला चाहत्याने दिली आहे. तेव्हा आता या मुद्द्यावर शाहरुख काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



सध्याच्या घडीला देशभरात जामिया मिल्लिया अस्लामियामध्ये Jamia Millia Islamia पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला, शिवाय अश्रूधुरही वापरला. दरम्यान, विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याच्या चर्चा पोलिसांनी धुडकावून लावल्या आहेत.