कंगनासोबतचा `किसिंग सीन`.... नुसता चिखल- शाहिद कपूर
किसिंग सीनच्या वेळचा अनुभव....
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच विषयांना हाताळत चित्रपट साकारण्यात आले आहेत. अशाच चित्रपटांमध्ये येणारं एक नाव म्हणजे 'रंगून'. समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटातून अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता शाहिद कपूर यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. याच चित्रपटातील एका दृश्याविषयीची माहिती, किंबहुना एक अनपेक्षित बाब शाहिदने उघड केली आहे.
अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या चॅट शोवर शाहिद त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पोहोचला होता. त्याचवेळी त्याने 'रंगून'मधील कंगनासोबतच्या किसिंग सीनविषयीची माहिती दिली.
'रंगून'मध्ये चिखलात कंगनासोबत्या किसिंग सीनच्या वेळचा अनुभव कसा होता, असा प्रश्न नेहाने शाहिदला विचारला. तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत शाहिद म्हणाला, 'हा अगदी सर्वसाधारण प्रश्न आहे. अर्थात त्याच्या किरकोळ आठवणी असाव्यात. मलातरी फार काही आठवत नाही.....', असं म्हणत जर त्यावेळी सर्वत्र चिखलच होता, तर ते दृश्यही चिखलंच होतं ही बाब शाहिदने स्पष्ट केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिद आणि कंगनामध्ये फार चांगलं समीकरण नव्हतं. त्यामुळे 'रंगून'च्या चित्रीकरणावेळीही त्यांच्यामध्ये आणि एकंदरच चित्रपटाच्या सेटवर फारसं खेळीमेळीचं वातावरण नव्हतं. दरम्यान, सध्याच्या घडीला जुन्या गोष्टींवर फार वेळ न दवडता शाहिद त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीवर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. 'कबीर सिंग' हा शाहिदची मध्यवर्ती भूमिका असणारा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.