`या` बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीनं पळून जाऊन दिग्दर्शकाशी केलं लग्न!
आज या दिग्दर्शकाचा वाढदिवस आहे.
मुंबई : बॉलिवूडच्या जगात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांच्या चित्रपटांची लोक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे जे.पी. दत्ता (J.P Dutta). 'बॉर्डर' सारखा उत्तम आणि हिट चित्रपट बनवल्यानंतर जे.पी. दत्ता यांना घरोघरी ओळख मिळू लागली. तरीही स्वातंत्र्य दिनानिमित्त हा चित्रपट बघायला प्रत्येकाला आवडतं. पण आपल्या चित्रपटांमध्ये देशभक्तीची भावना भरणाऱ्या जेपी दत्ता यांची प्रेमकहाणी तुम्हाला कदाचित मिस होत असेल. त्यांचे लग्न अशा परिस्थितीत झालं, ज्याबद्दल तुम्ही याआधी ऐकलं नसेल.
बातमीची लिंक : लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...'
'रेफ्युजी', 'एलओसी', 'बॉर्डर' सारखे सुपरहिट चित्रपट करून सर्वांची मने जिंकणारे दिग्दर्शक जेपी दत्ता यांचा आज वाढदिवस आहे. ( J.P Dutta Birthday) जेपी दत्ता यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1949 रोजी मुंबईत झाला. जेपी दत्तानं युद्धावर आधारित चित्रपट बनवून बॉलिवूडमध्ये एक वेगळी जागा निर्माण केली होती. चित्रपटांसोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीसोबत त्यानं पळून जाऊन लग्न केल्याचं सांगितले जाते.
आणखी वाचा : 'Bigg Boss Marathi' च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story
जेपी दत्ता यांच्या पत्नीचं नाव बिंदिया गोस्वामी (Bindiya Goswami) आहेत. बिंदिया गोस्वामी या 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गोलमाल', 'आंबट-गोड', 'खुद्दार' अशा अनेक चित्रपटांमध्ये बिंदिया गोस्वामी यांनी काम केले आहे. त्या काळातील प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा (Vinod Mehra) यांची बिंदिया ही दुसरी पत्नी होती. पण 1985 मध्ये त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्याशी लग्न केलं. विनोद मेहरा यांची कमी होत असलेली लोकप्रियता पाहून त्यांनी अभिनेत्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला, असा अनेकांचा समज होता. दुसरीकडे, जेपी दत्ता यांचे नाव सतत समोर येऊ लागले आणि लोकांना त्यांचे चित्रपट आवडू लागले.
बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक
जेपी दत्ता आणि बिंदिया यांची पहिली भेट 'सरहद' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली, नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर जेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा बिंदियाच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. यानंतर बिंदिया यांनी घरातून पळून जाऊन जेपी दत्ता यांच्याशी लग्न केले. (bollywood actor vinod mehra wife eloped to get married to film director j dutta)