लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...'

काजोल आणि युगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 3, 2022, 11:36 AM IST
लेकाच्या 'त्या' कृतीवर काजोल म्हणते, 'चुका होतात पण...' title=

मुंबई : सध्या संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाचा आनंद घेत आहे. बऱ्याच ठिकणी बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी, सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि काजोल (Kajol) यांचं नाव नेहमीच पुढे येतं. काजोल ही नेहमीच आई तनुजा आणि बहीण तनिषा यांच्यासह दुर्गापूजा करताना दिसते. यावेळी ती मुलगा युग देवगणसह सार्वजनिक नवरात्रोत्सवात पूजा करताना, देवीचं दर्शन घेताना आणि भक्तांची सेवा करताना दिसली. मात्र, या वेळी चर्चा ही मात्र, तिचा लेक युगची आहे. 

आणखी वाचा : 'Bigg Boss Marathi' च्या नव्या पर्वाला प्रेमाचा तडका; पाहा रुचिरा आणि रोहितची Pyaar Wali Love Story

काजोलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काजोल आणि तिचा लेक युग दिसत आहेत. काजोलनं लाल रंगाची साडी परिधान केली आहे.  तिचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर युगनं आईला मॅचिंग असा कुर्ता परिधान केला आहे. काजोल आणि युग या व्हिडीओत भक्तांना जेवण वाढताना दिसत आहे. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : 'तुम लोगो ने मेरी बीवी को...', मिलिंद गवळीला पाहून शेजारी संतापला

हा व्हिडीओ शेअर करत काजोलनं युगकडून चुका झाल्या असतील पण त्यानं केलेल्या कामाचा तिला गर्व असल्याचं म्हणत काजोल म्हणाली, 'पूजा करताना चुका होतात पण त्या समजून घेणं आणि सेवा करणाऱ्या माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो. अशाप्रकारे परंपरा पुढे चालत राहते.' युगच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. (kajol is a proud mom as son yug serves bhog during Durga puja viral video) 

आणखी वाचा : 'माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या...', सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, काजोल दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा करताना दिसते. एवढंच नाही तर ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात जाऊन देवीचं दर्शनही घेते. यावर्षीही ती बहीण तनिषा आणि आणि तनुजा यांच्यासह देवीचं दर्शन घेताना दिसली. पारंपरिक लुकमधील काजोलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.