Alia Bhatt Viral Video : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) हिनं एका मुलीला जन्म दिला. (Ranbir kapoor Alia bhatt wedding) रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांनीच आलियानं तिच्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांच्या भेटीला आणली होती. दिवस सरले आणि पाहता पाहता आलिया- रणबीरच्या आयुष्यात एका चिमुकलीची एंट्री झाली. राहा, असं आलियाच्या मुलीचं नाव (Alia bhatt daughter name). बॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा कुटुंबाची सून आणि आता एका मुलीची आई असणाऱ्या आलियाचा एक नवा प्रवास आता खऱ्या अर्थानं सुरु झाला. यामध्ये तिच्यापुढे स्वत:च्या करिअरला योग्य दिशा देण्याचं आव्हान आहेच. 


आलिया प्रसूतीनंतर इतकी स्थूल झालीये? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यावेळी करिअरचा मुद्दा येतो तेव्हा एक बाब लक्षात घ्यावी लागेल की अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शारीरिक सुदृढता आणि त्यामध्ये असणारं सातत्यही तितकंच महत्त्वाचं. आलियाच्या बाबतीतसुद्धा हे लागू होतं. किंबहुना काही दिवसांपूर्वी तिचे असे काही व्हिडीओ समोर आले जिथं ही अभिनेत्री योगसाधनेचा आधार घेत पुन्हा एकदा आपल्या शरीराला प्राधान्य देताना दिसली (Alia bhatt weight transformation). 


हेसुद्धा वाचा : Samantha Ruth Prabhu: सामंथाचं सौंदर्य झालं कमी? अभिनेत्रीचं धक्कादायक खुलासा; नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या


हे सर्व सुरळीत सुरु असतानाच एकाएकी आलियाचे काही फोटो समोर आले. या फोटोंमध्ये ही अभिनेत्री चांगलीच स्थूल झाल्याचं दिसत आहे. काहींनी हे फोटो पाहून आलियानं नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे, त्यामुळं शरीरात होणाऱ्या बदलांमुळे हे झालं असावं असं म्हटलं. तर, काहींनी आपल्याला विश्वासच बसत नाहीये की ही आलिया आहे, अशाही प्रतिक्रिया दिल्या. पण, खरंच या फोटोमध्ये दिसत असल्यानुसार आलिया स्थूल झालीये? 


हा आहे तिच्या ऑडिशनच्या व्हिडीओमधील स्क्रीनग्रॅब 


आलियाचा हा फोटो बराच जुना आहे. किंबहुना हा फोटो नसून तो तिच्याच एका ऑडिशनच्या व्हिडीओतील स्क्रीनग्रॅब आहे. काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या असणाऱ्या एका टी शर्टमध्ये आलिया इथं दिसत आहे. मोकळे केस आणि नो मेकअप लूक असं तिचं रुप इथं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती रणबीरच्याच 'वेक अप सिड' या चित्रपटातील एक डायलॉग म्हणताना दिसत आहे. थोडक्यात व्हिडीओ पाहून आलिया पूर्वी कशी दिसायची याचा अंदाज आता तुम्हाला आलाच असेल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Alia Ke Fans  (@aliakefans)


आगामी प्रोजेक्टसाठी करतेय तयारी... 


आलियाच्या आगामी प्रोजोक्टविषयी सांगावं तर, सध्या ती आपल्या कामावर आणि कुटुंबावर एककेंद्री असल्याचं दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर, यानंतर फरहान अख्तरच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्य़ा 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफसुद्धा झळकणार आहेत.