Viral Video : संघर्ष कोणालाच चुकला नाही. किंबहुना प्रत्येकजण यशस्वी होतोच असंही नाही. पण, आपल्याला शक्य आहेत ते सर्व प्रयत्न करत राहणं हेच काय ते हातात असतं. जीवनाच्या प्रत्येक वळणावर काहीतरी नवं शिकण्याची संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणारी अनेक मंडळी तुम्हीआम्ही पाहिली आहेत. यामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचंही काम येतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त रुपेरी पडदा आणि कलाजगतापुरता सीमित न राहता या अभिनेत्रीनं तिच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आणि नवनवीन टप्प्यांवर यश संपादन केलं. वजनदार बुलेट मोठ्या रुबाबात चालवणं म्हणू नका किंवा ऑफरोडर अर्थात खाचखळग्यांच्या कठीण वाटांवर चारचाकी घेऊन भटकंतीसाठी जाणं म्हणू नका. साचेबद्ध आयुष्याला शह देत ही अभिनेत्री कायमच सर्वांच्या नजरा वळवताना दिसली. तिचं नाव आहे गुल पनाग. 


अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमधून झळकणाऱ्या गुल पनागनं कायमच तिचं वेगळेपण दाखवून दिलं आहे. आतासुद्धा अशाच एका कारणामुळं ती चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत काही फोटोही जोडले आहेत. जिथं गुल वैमानिकाच्या पोषाखात दिसत आहे. हा पोषाख कोणत्या चित्रीकरणासाठी नसून, गुलनं खरंखुरं विमान उडवलं आहे. 


हेसुद्धा पाहा : जावई माझा लाखामोलाचा...; KL Rahul च्या शतकी खेळीनंतर सुनील शेट्टीनं आनंदाच्या भरात काय केलं? 


 


इन्स्टाग्रामवर तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे जिथं गुल चक्क विमान उडवताना दिसतेय. हजारो फुटांच्या उंचीवर तिनं घेतलेली ही गगनभरारी पाहम्यासोबतच तिचे Driving Skills सुद्धा या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. बऱ्याच दिवसांनंतर विमान उडवण्याची संधी मिळाल्याचा आनंद तिनं काही फोटो शेअर करत त्या फोटोंच्या कॅप्शनमधून व्यक्त केला आहे.



कोणत्या एअरलाईनसाठी उडवते विमान? 


गुल पनागनं तिचा विमान उडवतानाचा व्हिडीओ पोस्ट करताच 'तू कोणत्या कंपनीसाठी (एअरलाईनसाठी) विमान उडवते? असेच प्रश्न अनेकांनी विचारले. गुलनंच याचं उत्तर देत आपण CPL म्हणजेच कमर्शिअल पायलट नसून, फक्त छंद म्हणून विमान उडवत असल्याचं म्हणत Private Pilot असल्याचं स्पष्ट केलं. इथं खासगी विमान उडवतानाच्या निकषांची यादीसुद्धा तिनं सर्वासोबत शेअर केली. गुलचं हे रुप सर्वांनाच आवडलं, तुम्हालाही ना?