जावई माझा लाखामोलाचा...; KL Rahul च्या शतकी खेळीनंतर सुनील शेट्टीनं आनंदाच्या भरात काय केलं?

Ind  Vs Pak Highlights : विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं पाकिस्तानपुढं 356 धावांचा डोंगर उभा केला आणि इथंच पाकचा आत्मविश्वास कोलमडला.   

Sep 12, 2023, 10:40 AM IST

Ind  Vs Pak Highlights : आशिया चषकामध्ये (Asia Cup 2023) नुकताच भारत- पाकिस्तान सामना पार पडला. जिथं भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानला धुळ चारली. 

 

1/7

धावसंख्येत मोलाचं योगदान

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

106 चेंडूंमध्ये त्यानं 12 चौकार आणि 2 षटकार ठोकत भारतीय धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. इथं त्याची फलंदाजी कडाडतानाच तिथं सोशल मीडियावर चाहत्यांनी कल्ला करण्यास सुरुवात केली.   

2/7

जावयाचं तोंड भरून कौतुक

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

सर्व स्तरांतून केएल आणि विराटचं कौतुक झालं. अगदी केएलचे सासरे म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी यानंही जावयाचं तोंड भरून कौतुक केलं.   

3/7

ऑनफिल्ड फोटो

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

राहुलचा ऑनफिल्ड फोटो पोस्ट करत सुनील शेट्टीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एक भव्य कामगिरी, एक अद्वितीय पुनरागमन... सर्व प्रयत्नांना बळ देणाऱ्या नियतीचे आभार आणि कृतज्ञता.'  

4/7

पत्नीकडूनही कौतुक

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

तिथं केएलची पत्नी आणि सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीनंही या यशासाठी पतीचं कौतुक केलं.   

5/7

तू सर्वस्व आहेस...

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

'रात्र कितीही गडद असली तरीही ती सरते आणि सूर्योदय होतो... तू सर्वस्व आहेस I Love You', असं तिनं लिहित तिनं केएलचा फोटो आणि व्हिडीओ शेअर केला.   

6/7

सुरेख नातं

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

केएल राहुल आणि शेट्टी कुटुंबाशी असणारं त्याचं सुरेख नातं यानिमित्तानं जमागसमोर आलं आणि चर्चा सुरु झाली या सेलिब्रिटी नातेसंबंधांची.    

7/7

विराटच्या साथीनं ...

Asia Cup 2023 Photos Suniel Shetty celebrates Kl Rahuls writes a post

विराटच्या साथीनं केएल राहुलनं मैदान राखलं आणि बिनबाद 111 धावा केल्या. बऱ्याच काळानंतर केएलला खेळपट्टीवर सूर गवसला आणि या संधीचं त्यानं सोनं केलं. असं की क्रिकेटप्रेमींना कायम लक्षात राहील.