शिल्पामागोमाग कंगनाच्या घरीही नव्या पाहुण्याची चाहूल
इवल्याश्या पावलांनी येणार आनंदवार्ता....
मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या कुटुंबातील एका खास पाहुणीच्या आगमनाची माहिती सर्वांना दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पाने आपल्या मुलीचा एक फोटो पोस्ट करत तिच्या स्वागतार्ह पोस्टही लिहिली. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पाने एका मुलीचं पालकत्वं स्वीकारलं. ज्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत हिच्या घरीसुद्धाच इवल्याश्या पावलांनी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याचं उघड झालं.
शिल्पाने तिच्या नव्या इनिंगविषयी माहिती दिल्यानंतरच कंगनाच्या घरुनही ही बातमी समोर आली. कंगनाच्या कुटुंबात येणाऱ्या नव्या पाहुण्याविषयीच्या चर्चाही रंगल्या. कारण ठरलं ते म्हणजे तिच्या बहिणीने केलेलं एक ट्विट.
मला एक बाळ आहेच. पण, मला आणखी एका बाळाचं पालकत्वं स्वीकारायचं आहे. त्यामुळे मी आणि माझ्या पतीने मुल दत्तक घेण्याचं ठरवलं आहे. मी अनेकांनाच सांगू इच्छिते की सरोगसीऐवजी तुम्ही मुल दत्तक घेण्याला प्राधान्य द्या', असं म्हणत रंगोलीने या जगात एका आधारापासून वंचित असलेल्या मुलांना आधार देण्याचा संदेश अनेकांनाच दिला.
कंगनानेच आपल्याला हा निर्णय घेण्यास प्रेरणा दिल्याचं रंगोलीने या ट्विटने सांगितलं. 'पती आणि आपण यासाठीची सर्व प्रतिक्रिया पूर्ण केली असून, येत्या काही महिन्यांमध्ये आमची मुलगी आमच्यासोबत असेल. कंगनाने तिचं नाव गंगा असं ठेवलं आहे. एका बाळाला घर मिळवून देण्यात आम्ही आमचच भाग्य समजतो', असंही रंगोलीने ट्विटमध्ये नमूद केलं.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
सोशल मीडियाच्या माध्यमातून रंगोलीने त्यांच्या कुटुंबात येणाऱ्या या आनंदवार्तेविषयी सांगितलं. सोबतच एका अर्थी सरोगसीला प्राधान्य देणाऱ्या शिल्पावर तिने सौम्य शब्दांत निशाणाही साधल्याचं सध्या म्हटलं जात आहे.