मुंबई : हिंदी कलाविश्वात सेलिब्रिटी जोड्यांचं एक वेगळंच विश्व पाहायला मिळतं. या जोड्या कशा एत्र येतात आणि त्यांच्या वाटा कधी अनपेक्षिपणे वेगळं होतात याविषयी जाणून घेण्यासाठी मग चाहत्यांमध्येही कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. अशीच एकेकाळी आपल्या प्रमेसंबंधांमुळे प्रकाशझोतात असणारी एक जोडी म्हणजे अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता शाहिद कपूर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारंकाही सुरळीत सुरु असतानाच करीना आणि शाहिद एकेमेकांपासून वेगळे झाले. अनेकांनाच हा एक धक्का होता. पण, ही सारी परिस्थिती, त्यावेळचे प्रसंग हे सारं नशिबाचाच भाग असल्याचं मत करिनाने मांडलं. चित्रपच समीक्षक अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत 'बेबो' करिनाने तिच्या आणि शाहिदच्या नात्यात आलेल्या या दुराव्याविषयी अत्यंत संवेदनशील शब्दांत उत्तर दिलं. 


इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच करीना आणि शाहिदच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्याचवेळी 'टशन' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करिना आणि सैफ अली खान यांच्यातील नातं आणखी दढ झालं. याचविषयी सांगत करिनाने या मुलाखतीत काही मोठे खुलासे केले. शाहिदने कशा प्रकारे आपल्याला 'गीत'ची भूमिका साकारण्यास प्रोत्साहन दिलं होतं, हेसुद्धा तिने सांगितलं. 'त्यावेळी नशिबाने आपल्यासाठी काही वेगळेच बेत आखले होते. हा (जब वी मेट) चित्रपट, टशन साकारताना खूप काही घडून गेलं होतं. आमच्या जीवनातही खूप काही घडलं होतं. ज्यानंतर आम्ही वेगळ्या वाटांवर गेलो.', असं ती म्हणाली. 


'जब वी मेट' या चित्रपटाने आपलं करिअर बदलल्याची बाब करिना स्वीकारते. तर, 'टशन' या चित्रपटाने मात्र आपलं पुरतं आयुष्यं बदलल्याचंही ती न विसरता सांगते. 'जब वी मेट हा चित्रपट आपल्या करिअरसोबतच आयुष्यही बदलेल असं करीनाला वाटत होतं. पण, टशनमुळेच तिचं आयुष्य बदललं कारण, स्वप्नातला राजकुमारच तिला भेटला ज्याच्याशी पुढे जाऊन ती विवाहबंधनात अडकली. 



शाहिदला जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर जेव्हा अनेकांनाच त्यांच्या या नात्याची शाश्वती मिळू लागली. तेव्हाच ही सेलिब्रिटी जोडी वेगळी झाली. नात्यांची समीकरणं आणि या कलाकारांची आयुष्य अशा वळणावर आली, जेथे त्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. पुढे जाऊन दोघांनीही त्यांच्या खासगी आयुष्यात आपआलल्या साथीदारांसमवेत नव्या जीवनाची सुरुवात केली.


वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'


करीनाने पाच वर्षे सैफला डेट केल्यानंतर त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर, शाहिदनेही या कलाविश्वाबाहेरील एका मुलीशी म्हणजेच मीरा राजपूत हिच्याशी लग्नगाठ बांधली. सध्याच्या घडीला नात्यांच्या गुंतागुंतीपासून दूर आलेले हे सेलिब्रिटी सुखी आयुष्य जगत आहेत.