मुंबई : 'देसी गर्ल' म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा परदेशी प्रियकर म्हणजेच निक जोनास आता विवाहबंधनात अडकले आहेत. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही विवाहपद्धतींनुसार त्यांचा विवाहसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याचे फोटो प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेएरही केले. ज्यानंतर बऱ्याच चर्चांना, विनोदांना आणि मुख्य म्हणजे मीम्सना उधाण आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकाने तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले, ज्या फोटोंमध्ये एक काकू मोठ्या उत्साहात ओरडताना दिसत आहेत. अर्थात फोटोतील इतर मंडळीसुद्धा उत्साहात आहेत, पण काकूंना काही तोड नाही. 


आता या काकूंचे हेच हावभाव नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन गेली आहे. परिणामी धम्माल विनोदी मीम्सची गर्दी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. चला तर मग नजर टाकूया अशाच काही विनोदी मीम्सवर...








कोणी म्हणतंय या काकूंनी निक- प्रियांकावरून सर्वांच्या नजरा हटवत स्वत:कडेच लक्ष वेधलं आहे. तर कोणी या जोडीच्या वयामध्ये असणारं अंतर ऐकून कोण कशी प्रतिक्रिया देईल याचंच उदाहरण या मीम्समध्ये पाहायला मिळत आहे. 


फक्त या फोटोंना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे असं नाही. तर, इतरही बरेच असे फोटो आहेत, ज्यांचे मीम्स सध्या व्हायरल होत असून एका वेगळ्याच कारणामुळे प्रियांका आणि निकचा विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्याही मीम्सना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं.