Valentine`s Day : 'व्हॅलंटाईन्स डे' हा दिवस संपूर्ण जग साजरा करतं. प्रेमाची निखळ भावना आणि या भावनेप्रती असणारी आत्मियता या दिवशी व्यक्त केली जाते. प्रत्येकजण हा दिवस आपआपल्या परीनं साजरा करतो. खास व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देतो. पण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मात्र या मनस्थितीत सध्यातरी नाही. तिची इन्स्टाग्राम पोस्ट पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. 


तुर्की भूकंपामुळं हादरली प्रियांका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांकानं नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये तिनं भूकंपग्रस्त तुर्कीची अशी काही दृश्य जगासमोर आणली जे पाहून अनेकांच्याच काळजाचं पाणी होईल. 'आठवड्याभरानंतरही त्या वेदना आणि अडथळे सीरिया, (Turkey Earthquake) तुर्कीतील जनतेसमोर उभेच आहेत' असं म्हणत तिनं काही फोटो आणि व्हिडीओ जगासमोर आणले. यातील प्रत्येक दृश्य पाहताना पोटात खड्डा पडत होता. 


हेसुद्धा वाचा : 'या' अभिनेत्यानं चार वेळा केलं लग्न! एक पळून गेली तर दुसरीला आईनं फेकून मारली चप्पल


प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आपल्या जवळच्या व्यक्तीला काकुळतीनं साद घातलाना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये खाद्यपदार्थाच्या एका पाकिटासाठी आसुसलेल्या अनेक नजरा दिसत आहेत. या साऱ्यामध्ये एक फोटो पाहून मनात भावनांचा काहूर माजत आहे. 


प्रथमदर्शनी हा फोटो एका घरातील असल्याचं स्पष्ट होत आहे. जिथं भिंतीवर I Love You अशी अक्षरं असणारे फुगे दिसत आहेत. खोलीमघधील बहुतांश भागाची पडझड झालेली यामध्ये स्पष्ट दिसत आहे. इथं कुणीतरी कुणाकडेतरी आपल्या प्रेमाची कबुली देत असेल, कुणासाठीतरी हा आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असेल किंवा कुणासाठी सर्वात महत्त्वाचा क्षण. पण, एका भूकंपात हे सर्वच उध्वस्त झालं हे दाहक वास्तव मात्र नाकारता येणार नाही. जगभरात Valentine`s Day साजरा होत असतानाच हा फोटो समोर आल्यामुळं अनेकांचेच डोळे यामुळं पाणावले आहेत. 



हे प्रियांकाच करु शकते... 


प्रियांकानं ज्या क्षणी हे फोटो आणि तुर्की भूकंपग्रस्तांच्या यातना मांडत त्यांच्यासाठी मदतीचं आवाहन केलं त्याच्या पुढच्याच क्षणाला नेटकऱ्यांनी तिचं कौतुक करण्यास सुरुवात केली. (Bollywood) बॉलिवूडमधून तुलाच ही भावना व्यक्त कराविशी वाटली, हे तुलाच शक्य आहे असं म्हणच तिनं दिलेल्या मदतीबद्दल काहींनी कृतज्ञता व्यक्त केली. तर, थेट तुर्कीतून काहींनी कमेंट करत आपल्या भागातील परिस्थिती तिच्यापुढं मांडण्याचा प्रयत्न केला.