Sai Pallavi : दाक्षिणात्य कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय असणारी अभिनेत्री साई पल्लवी दिवसागणिक या न त्या कारणानं चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. अद्यापही हिंदी कलाजगतामध्ये तिनं पदार्पण केलं नसली तरीही तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होण्यात भाषेनं कधीच अडथळा आणला नसल्याचच स्पष्ट होत आहे. No Make Up लूकमध्येच स्क्रीनवर येणाऱ्या आणि प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या या अभिनेत्रीचा एक चाहता या कलाजगतातही आहे. ती त्याला इतकी आवडतेय की अखेर त्यानं याची कबुलीही दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता आहे गुलशन देवैय्या. हल्लीच गुलशननं साई पल्लवी आपली क्रश असल्याचं म्हणत तिचा फोन नंबरही माझ्याकडे आहे, पण कधीच तिला फोन केला नाही अशी कबुली दिली. ती मला खूप आवडते, जणू काही तिचं obsession च आहे, असं तो म्हणाला आणि अनेकांच्याच नजरा वळल्या. इतक्यावरच न थांबता तो तिच्याबद्दल असणाऱ्या आकर्षणाविषयी खूप काही बोलून गेला हो पण, आपल्या या अनोख्या नात्यात आणखी कोणताही अर्थ काढण्याचा वाव नसल्याचंही त्यानं बोलता बोलता स्पष्ट केलं. 


गुलशनच्या भूतकाळाचीही एकच चर्चा... 


साई पल्लवीबाबत भरभरून बोलून गेलेल्या गुलशनचं यापूर्वी लग्न झालं होतं. मूळची ग्रीसची असणारी अभिनेत्री Kallirroi Tziafeta हीच्यासोबत त्यानं 2012 मध्ये वैवाहित आयुष्याची सुरुवात केली होती. पण, आता मात्र ते एकत्र नाहीत. असं असलं तरीही गुलशन आणि त्याच्या Ex Wife मध्ये आजही मैत्रीपूर्ण नातं असून, या नात्यात कोणत्याही गोष्टीमुळं वादंग माजणार नसल्यावर आपण दोघांनी लक्ष दिल्याचंही त्यानं मुलाखतीदरम्यान सांगितलं. 


'मला साई पल्लवीवर Crush आहे आणि हे नवं नाही. माझ्याकडे तिला मोबाईल नंबरही आहे पण तिला समोरून फोन करण्याचं धाडस नाही. मला वाटतं की ती एक उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. हो पण मला वाटलं हे Crush च आहे. कधीकधी मला तिच्याबद्दल आकर्षण वाटतं पण ती एक सक्षम अभिनेत्री आहे. मी आशा करतो जीवनात कधी ना कधी मला तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल, माझा आनंद यातच असेल', असं म्हणताना त्यानं तिच्यावर स्तुतीसुमनं उधळणं सुरुच ठेवलं. 


हेसुद्धा वाचा : शाहरुखने नव्या संसदेच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर NCP चा टोला; म्हणाले "नेमकी कसली भीती..."


 


ती सध्या माझी पत्नी नसली तरी माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे, अशी मैत्रीण जिच्याकडे मी काहीही बोलू शकतो, कोणाला भेटलो तर तिला सांगतो... असं म्हणत गुलशननं हे नातं सर्वांपुढे आणलं.