Why Karan Johar is Still Single : बॉलिवूडचे दिग्गज फिल्ममेकर करण जोहर हा नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी, त्याच्या हटके फॅशनसाठी चर्चेत असतो. त्याशिवाय सतत जी गोष्ट चर्चेत असते ती म्हणजे करण जोहरचं खासगी आयुष्य. नुकतंच करण जोहरला विचारण्यात आलं की आजवर तो सिंगल का आहे? त्यासोबत त्यानं रिलेशनशिप आणि ज्युरासिक पार्कच्या वाइल्ड जगाची तुलना केली. याविषयी सोशल मीडियावर त्यानं सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितलं की मी आजपर्यंत सिंगल का आहे? कारण रिलेशनशिप हे पार्कमध्ये फिरण्यासारखं आहे, ज्युरासिक पार्कमध्ये. करण जोहरनं या आधी जुलैमध्ये फाय डिसूजासोबत चर्चा केली होती की ते गेल्या काही दिवसांपासून तो सिंगल आहे आणि आता तो कोणत्याही पार्टनरच्या शोधात नाही. 



करण जोहरनवं हे मान्य केलं की संपूर्ण आयुष्यात ती फक्त दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली आणि त्यानं संपूर्ण आयुष्यात जितकी मज्जा केली नसेल तितकी त्यानं आता केली. करण जोहरनं सांगितलं की "मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की मी सिंगल लाइफचा किती आनंद घेतोय. आता हे बदलायला हवं असं मला वाटत नाही. बाथरुम किंवा बेडरुम किंवा मग माझी स्पेस किंवा मग माझं शेड्यूल शेअर करणं तर विसरूनच जा. मला आता माझा प्रत्येक दिवस हा स्वत: सोबत घालवायचा आहे आणि त्यात आनंद कसा मिळवायचा हे मला आता कळलं आहे. तुमची जबाबदारी ही तुमची मुलं आणि आईसाठी आहे. आता फक्त हेच आहे." 


करण जोहरनं हे मान्य केलं की 'एक काळ होता जेव्हा सिंगल राहणं खूप त्रास दायक होतं. सगळ्यात महत्त्वाचं तेव्हा जेव्हा तो त्याच्या 40शीत होता. पण जोपर्यंत 50 चा झाला, तेव्हा जसं सगळं सुरु होतं त्यावरून त्याला त्याचं आयुष्य आणखी स्थिर वाटू लागलं.' 


हेही वाचा : Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; 'हा' चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार


करणनं पुढे सांगितलं की मी खूप वाईट काळातून गेलोय ब्लाइंड डेटसारखी परिस्थिती पाहिली आहे. देशात आणि देशाच्या बाहेर आणि आता मला सगळं काही चांगलं आणि आनंदी दिसतंय. मला आता या सगळ्या गोष्टींची गरज वाटत नाही. कामाविषयी बोलायचं झालं तर करण जोहर अमेरिकन रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स' चं सुत्रसंचालन करण्यासाठी जाणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी दिसणार आहेत.