Oscar 2025 साठी भारताची आशा टिकून; `हा` चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga`s Movie : ऑस्कर 2025 मध्ये भारताला अजूनही संधी! गुनीत मोंगाचा हा चित्रपट मिळून देऊ शकतो अकादमी पुरस्कार
Oscar 2025 Guneet Monga's Movie : आमिर खान आणि किरण रावचा 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या पुढच्या राऊंडमध्ये स्वत: चं स्थान मिळवण्यास अपयशी ठरलाय. त्या यादीत एकूण 15 चित्रपटांची निवड झाली. त्या यादीत संध्या सूरी यांच्या 'संतोष' या चित्रपटाला देखील सहभागी करण्यात आलं आहे. दरम्यान, असं असलं तरी भारताला एक आशा अजूनही आहे. कारण गुनीत मोंगा कपूरनं निर्मिती केलेल्या लाइव्ह-अॅक्शन शॉर्ट फिल्मनं 'अनुजा' या श्रेणीत जागा मिळवली आहे. हा चित्रपट कपडे बनवण्याच्या व्यवसायात बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करतो.
अभिनेते नागेश भोसले सारख्या कलाकारांनी यात अभिनय केला आहे. ऑस्कर अकादमी सदस्यांनी उज्ज्वल निरगुडकर यांनी सांगितलं की मी आनंदी आहे की लाइव्ह-अॅक्शन शॉर्ट फिल्ममध्ये 'अनुजा', 180 शॉर्ट फिल्ममधून निवडण्यात आली आहे. गुनीत मोंगा या चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे. तर यात अनेक कलाकारांचं योगदान आहे. यावरून भारतीय प्रतिभेची जागतिक स्तरावर ओळख होत असल्याचे थोडक्यात दिसून येत आहे.
आता या कॅटेगरीमध्ये कोणत्या शॉर्ट फिल्मशी 'अनुजा' ची स्पर्धा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यात 'टच', 'नीकॅप', 'वर्मिग्लियो', 'फ्लो', 'आर्मंड', 'फ्रॉम ग्राउन्ड झीरो', 'डाहोमी' आणि हाउ टू मेक मिलियन्स बिफोर ग्रॅंडमां डाइज' आहे. अकादमीनं खुलासा केला की 97 व्या अकादमी पुरस्कारांसाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत आहे. 85 देश किंवा विभागांनी त्यांचा चित्रपट प्रस्तुत करत आहेत.
हेही वाचा : 55 व्या वर्षी भाग्यश्री झाली फिटनेस कोच! क्रॅब वॉक ते हेल्दी डिशचे व्हिडीओ शेअर करत सांगितले फायदे
'लापता लेडीज' हा चित्रपट 2000 दशकाच्या सुरुवातीला ग्रामीण भारतावर आधारीत आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाईनं लिहिले आहेत. स्नेहा देसाई यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवादा लिहिले आहेत. तर हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. त्यात दिव्यनिधी शर्मा द्वारे अतिरिक्त वाक्य जोडली जातात. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण ओटीटीवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं होतं. त्यामुळे आता प्रेक्षकांना आणि सगळ्या भारतीयांना फक्त आशा आहे ती गुनीत मोंगाच्या चित्रपटाकडून.