मुंबई : 'धकधक गर्ल' अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्या एका स्मितहास्यावर कोट्यवधींच्या संख्येनं लोकं भारावून जातात. तिनं साकारलेली प्रत्येक भूमिकासुद्धा अगदी सर्वांच्याच मनाचा ठाव घेते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरीच्या याच सौंदर्यानं, तिच्या नृत्य कौशल्यानं भलेभले घायाळ झाले. अगदी बॉलिवूडमधील काही कलाकारही यातून सुटले नाहीत. 


हिंदी चित्रपटसृष्टीत हिरो नंबर 1 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता गोविंदा हेसुद्धा त्यांच्यापैकीच एक. 


तुम्हाला माहितीये का, गोविंदानंही माधुरी दीक्षित हिला लग्नाची मागणी घातली होती. 


विश्वास बसत नाहीये? खुद्द गोविंदा यांनीच याबाबतचा खुलासा केला आहे. 


माधुरीच्या सौंदर्यानं ते असे काही भारावले होते, की तुला हवं ते करवून घे, डान्सही करवून घे पण लग्नच का करत नाहीस माझ्याशी? असा प्रश्न त्यांनी माधुरीला केला होता. 


एका रिअॅलिटी शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून हजेरी लावत गोविंदा यांनी याबाबतचा खुलासा केला. 


सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ कमाल करत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by (@madhuridixitnene___)


बरं, माधुरीला लग्नासाठी विचारलं होतं हा खुलासा जेव्हा त्यांनी केला तेव्हा तिथंच बसलेल्या माधुरीला हसू थांबवणंही कठीण झालं होतं.