मुंबई : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहेत. नुकतंच बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनही (Bollywood Marathi Actress Isha Koppikar ) कास्टिंग काऊचविषयी (Casting Couch)  गौप्यस्फोट केला आहे. यामुळे तिला अनेक चित्रपट गमावावे लागले, असेही तिने यावेळी म्हटले.


आणखी वाचा : Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशा ही सध्या बॉलिवूडच्या चंदेरी विश्वापासून लांब आहे. तरी देखील ईशाला खल्लास गर्ल म्हणून लोक ओळखतात. काही दिवसांपूर्वी ईशानं 'बॉम्बे टाईम्स'ला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, 'मी एक मुर्ख अभिनेत्री आहे. चित्रपटसृष्टीतील गुंड प्रवृत्तीची अभिनेत्री म्हणून माझ्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. या कारणामुळे मला अनेक चित्रपटांसाठी नाकारलं. मी इथे फक्त कामासाठी आले होते. त्यामुळे जर मला तुम्ही आवडत असालं तरच मी तुमच्याशी बोलेन, पण जर तुम्ही माझ्यासोबत वाद घातलात तर मात्र मी मात्र त्याच भाषेत उत्तर देते.'


आणखी वाचा : 'सामी सामी' गाण्याची गोविंदा स्टाइल पाहिली का? रश्मिकानंही दिली साथ Video Viral



आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip


पुढे कास्टिंग काऊचचा अनुभव सांगताना ईशा म्हणाली, '२००० साली मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले होते. त्यावेळी त्याने मला सांगितले की, तुला अभिनेत्याच्या नजरेत चांगले असायला हवे. त्यावेळी त्याला नेमकं काय म्हणायचे होते हे मला समजत नव्हते.'


आणखी वाचा : Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला


पुढे ईशा म्हणाली, 'त्यानंतर मी त्या हिरोला फोन केला. त्याने मला एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते. त्या दिवसात त्याच्यावर विश्वासघात केल्याचा असा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळेच त्याने मला माझ्या स्टाफला सोडून एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते. पण त्यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की मी माझ्या टॅलेंट आणि लूकमुळे येथे आली आहे. जर मला त्यातून चांगले काम मिळाले तर ते खूप चांगले होईल. पण याचा थेट परिणाम माझ्या करिअरवर झाला. मी अनेक चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. (Bollywood Marathi Actress Isha Koppikar Recalls Casting Couch Incident Says She Was Thrown Out After Refusing To Meet The Actor Alone) 


आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!


ईशाने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रब ने बना दी जोडी’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘राईट या राँग’,’मैंने प्यार क्यों किया’, ‘डरना जरुरी है’, ‘क्या कूल है हम’, ‘हम तुम’, ‘डॉन’, ‘कृष्णा कॉटेज’ आणि ‘क्या कूल है हम’यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये ईशानं अभिनय केला आहे.