Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?

श्वेतानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Updated: Sep 25, 2022, 10:59 AM IST
Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan) ही एक मॉडेल, लेखिका आणि बिझनेसवुमन आहे. श्वेता ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाही असं तिनं सांगितलं आहे. पण तिला तिच्या मुलांनी म्हणजेच नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) आणि अगस्त्य नंदानं (Agstya Nanda) वेगळा मार्ग निवडावा आणि आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहू नये असे वाटते. याविषयी श्वेतानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. 

आणखी वाचा : 'सामी सामी' गाण्याची गोविंदा स्टाइल पाहिली का? रश्मिकानंही दिली साथ Video Viral

श्वेता या विषयी लेक नव्या नवेली नंदाचा पॉडकास्ट 'वॉट द हेल नव्या' (What The Hell Navya) मध्ये सांगितलं आहे. या शोमध्ये नव्या तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगत होती.  दरम्यान, ETimes शी बोलताना श्वेतानं तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगताना म्हणाली, दुर्दैवानं आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र नाही पण मुलांच्याच्या बाबतीत असे घडायला नको. जे तिच्यासोबत झालं ते तिच्या तिच्या मुलांसोबत घडलं पाहिजे, असं तिला वाटतं नाही. (Shweta Bachchan admits she is not financially independent hopes Navya and Agastya do not think of getting married before having money in the bank) 

आणखी वाचा : Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या 'या' ड्रेसच्या किंमतीत, तुमचं संपूर्ण कुटूंब करु शकेल Europe Trip

श्वेताने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'जेव्हा मी माझ्या मुलीला शाळेत पाठवायचे, तेव्हा मला तिला असं बनवायचं होतं जिथे ती स्वत: च्या पायावर उभी राहील. माझ्या दोन मुलांसाठी नव्या-अगत्स्यासाठी मला हेच हवं आहे. कुटुंबाला सांभाळू शकतील इतके पैसे जो पर्यंत बँकेत नाहीत तो पर्यंत त्यांनी कुटुंब किंवा लग्न करण्याचा विचार करायला नको. मला वाटतं की माझ्या लेकीनं स्वत: च्या पायावर उभ राहत आर्थिकदृष्ट्या स्टऑंग रहावे, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. वडिलांचे पैसे न वापरता तिनं स्वतः काम करावं असं मला वाटतं.'

आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!

नव्यानं तिच्या पॉडकास्टमध्ये, तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चन यांच्याशी फायनान्स, प्रसिद्धी ते मैत्री आणि कुटुंब या सर्व गोष्टींबद्दल बोलताना दिसली. IVM पॉडकास्ट आणि इतर ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 24 सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी शोचा एक नवीन भाग प्रदर्शित होणार आहे. नव्या एक बिझनेस वुमन आहे आणि महिलांच्या आरोग्याशी संबंधित गोष्टींवर काम करते.