जेव्हा बिग बींनी हात खिशात घालून पूर्ण केली होती `शराबी` सिनेमाची शूटिंग, `हे` होतं त्यामागचं कारण
`शराबी` हा सिनेमा चहात्यांना एवढा आवडला की, रिलीजच्या पुढच्या वर्षी कन्नड मध्ये या सिनेमाचा रिमेक बनवला गेला.
मुंबई : बॉलिवूडचे शेहनशहा अभिनेता अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम विनोद, व्हिडिओ, फोटो, आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य तसंच आपल्या कारकिर्दी संबंधित अनेक गोष्टी सांगत असतात ते अनेकदा आपल्या जुन्या चित्रपट सेटवरील शूटिंग दरम्यानचे बरेच किस्से चाहत्यांसोबत शेअर करतात. बिग बींची सुपरहिट फिल्म कुली दरम्यान झालेला अपघात या मागची कहाणी त्यांनी अनेक वेळा सोशल मिडीयाद्वारे सांगितले आहे.
अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांचा शराबी हा सिनेमा हॉलिवुड 'ऑर्थर' वरून प्रेरित आहे हा सिनेमा चहात्यांना एवढा आवडला की, रिलीजच्या पुढच्या वर्षी कन्नड मध्ये या सिनेमाचा रिमेक बनवला गेला. त्याचं नाव होतं 'थंडा कनिके'. बऱ्याच लोकांना शराबी हा सिनेमा बघून वाटलं की अमिताभने आपल्या स्टाईलसाठी हा सिनेमा केला असावा मात्र खरं कारण होतं ते त्यांच्या हातावर झालेली जखम.
यावेळी अमिताभ यांनी स्वतः खुलासा केला की फटाके फोडताना त्यांच्या हाताला एक जखम झाली त्यांनी सांगितलं की, एकवेळी शराबी सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी दिवाळी होती, आणि यावेळी फटाके फोडताना त्यांच्या हातावर जखम झाली त्यांचा हात जळाला त्यांच्या हातावर फोटो निर्माण झाले आणि त्यांच्या हाताची तंदुरी चिकन तयार झाली मात्र अशा अवस्थेतही त्यांनी शूटिंग कंटिन्यू सुरू ठेवलं.
सिनेमाचा दिग्दर्शकांनी म्हणजेच प्रकाश मेहरा यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही या सिनेमात बिघडलेल्या मुलाची आणि बेवड्याची भूमिका साकारत आहात एक हात खिशात घाला. म्हणजे लोकांना याबद्दल काहिच कळणार नाही. हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा हा सिनेमा प्रेक्षकांना पसंतीस आला.
या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात अमिताभशिवाय जयाप्रदा, प्राण, ओम प्रकाश, अशी मोठी स्टारकास्ट आहे. गायक किशोर कुमार यांना 1984 फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बेस्ट प्लेबॅक सिंगरसाठी चार वेळा नामांकन मिळालं होतं गायक किशोरकुमार यांना मंजिल अपना जगा है रास्ते अपना अपना स्थान यासाठी पुरस्कारही मिळाला.