`वेड लागलंय का मला?`, पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याबाबत विचारताच अभिनेत्रीचा संताप
ही भयावह स्थिती आहे...
मुंबई : बॉलिवूडमध्ये नावाला वजन असणाऱ्या आणि आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या खासगी आयुष्यातूनही कायमच चौकटीबाहेरचे विचार मांडले. हा अभिनेता आणि त्याची पत्नी ही दोघंही सातत्यानं नात्याची एक वेगळी बाजू सर्वांसमोर आणताना दिसले. (Bollywood Ratna Pathak shah on karwa chauth fast for husband Actor Naseeruddin Shah)
आता म्हणे याच लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीनं भारतातील महिलांच्या परिस्थितीवर परखड मत मांडलं आहे. ठामपणे आपली भूमिका मांडणारी या अभिनेत्याची पत्नी आहे, रत्ना पाठक शाह, अर्थात ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची पत्नी.
भारतात महिलांच्या दृष्टीनं कोणतेच बदल झाले नसून, इथे लोक दिवसेंदिवस आणखी अंधश्रद्धाळू होत आहेत, इथे अनेकांनाच धर्माचा जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणून स्वीकार करण्यासाठी हतबल केलं जात आहे.
मला वेड लागलंय का?
आपल्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगताना त्यांना कोणीतरी, तुम्ही करवा चौथचा उपवास करत आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत शाह म्हणाल्या, 'मला वेड लागलंय का? सुशिक्षित महिला करवा चौथचा उपवास करतात हे भयंकर आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात कारण, त्यांना जगण्याची वॅलिडीटी हवीये? भारतामध्ये विधवा होणंही एक धास्तावणारी स्थिती आहे. खरंय ना? तर मग विधवा न होण्यासाठी मी काहीही करेन, खरंच?', असं म्हणत आपण 21 व्या शतकात असं काहीतरी म्हणत आहोत यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भारतीय महिलांना सौदी अरबमधील महिलांप्रमाणे व्हायचंय का, असा प्रश्नही रत्ना पाठक यांनी उपस्थित केला.
दिवंगत अभिनेत्री दीना पाठक यांच्या कन्या रत्ना पाठक यांनी 1982 मध्ये नसिरुद्दीन शाह यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. नसिर आणि रत्ना या दोघांनाही इमाद, विवान अशी दोन मुलंही आहेत.