मुंबई : वयाच्या 54 व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईत टबबाथमध्ये बुडल्याने श्रीदेवीचे निधन झाल्यानंतर तिच्या चाहत्यांसह कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. टबबाथमध्ये ‘accidental drowning’ चा धोका टाळण्यासाठी खास टीप्स


बोनी कपूर यांनी केलं ट्विट  


श्रीदेवीच्या अकाली निधनानंतर बोनी कपूर यांनी पहिल्यांदा त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. पत्रामध्ये त्यांनी चाहत्यांचे, मीडियाचे आभार मानले. 


 



काय म्हणाले बोनी कपूर  


श्रीदेवी ही जान्हवी, खुशी आणि माझ्या जीवनाचं, हसण्याचं कारण होती. आता तिच्या जाण्याने आमचं जीवन पुन्हा पहिल्यासारखं नसणार... पण आता यामधून जान्हवी आणि खुशी यांना बाहेर कसं काढायचं ? हा प्रश्न  आमच्यासमोर पडला आहे. 


श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुन कपूर आणि अंशुला माझ्या आणि जान्हवी, खुशीच्या मागे उभे राहिले त्यांचा मी आभारी आहे.  


श्रीदेवी उत्तम कलाकार  


श्रीदेवी ही उत्तम कलाकार आहे. तिच्यासारखी कलाकार होणे नाही. अशा शब्दांत कौतुक करताना तिच्या जाण्याने आयुष्यात पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी व्यक्त केले आहे.