Ranbir Kapoor Duplicate Viral Video: आजकाल अनेकदा आपल्याला बॉलिवूड सेलिब्रेटींचे डुप्लिकेट्स (Celebrity Duplicates) पाहायला मिळतात. कधी ते सामान्य नागरिकांशी रिलेट होतात तर कधी हॉलिवूड कलाकारांशी. यामध्ये कुठलेही लोकप्रिय कलाकार मागे पडलेले नाहीत. मग त्याला रणबीर कपूर अपवाद का असेल. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. (boys resemblance to ranbir kapoor little boy in viral video looks like ranbir kapoor internet stunned)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर सध्या रणबीर कपूरचा बेबी डुप्लिकेट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र' (Bramhastra) चित्रपटामुळे रणबीर कपूर चांगलाच चर्चेत आला होता, मात्र यावेळी त्याच्यासारखा दिसणारा एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीरव भट्ट (Nirav Bhatt) असे या मुलाचे नावं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या छोट्या क्लिपमध्ये हा लहान मुलगा कानात हेडफोन लावून बसलेला आहे आणि त्यातून गाणं म्हणतो आहे. सध्या याच व्हिडीओनं (Video) सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


या व्हिडीओवर सध्या रणबीर कपूरचे चाहते कमेंट्स करत आहेत. हा तर रणबीर कपूरच्या लहानपणीचा डुप्लिकेट आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत अनेकांनी लाईक आणि कमेंट केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून नीरव भट्टला चित्रपटांमध्ये घ्या असेही सुचविले आहे. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



नीरव भट्ट असे या मुलाचे नाव असून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तो काही जाहिरातीत काम करताना दिसतो आहे. नीरवच्या चेहऱ्यावरचे हसू हुबेहूब रणबीर कपूरसारखे आहे. लोक या मुलाचे कौतुक करत आहेत. रणबीर कपूरसारखा (Ranbir Kapoor Duplicate) हसरा मुलगा पाहून चाहते पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत. सध्या रणबीरनं हा व्हिडीओ पाहिल्याचे जाणवत नाही परंतु लवकरच प्रेक्षकांना रणबीर कपूर हा व्हिडीओ पाहिल आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देईल अशी आशा आहे.