Boyz 4 Trailer : बॉईज आर बॅक...  'बॉईज', 'बॉईज 2', 'बॉईज 3' नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला 'बॉईज 4' सज्ज झाले आहेत. नुकताच 'बॉईज 4'चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रत्येक 'बॉईज'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ट्रेलरवरून 'बॉईज 4' ही बॉक्स ऑफिस गाजवणार असल्याचे दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरवरून यावेळी धैर्या, ढुंग्या आणि कबीरमध्ये फूट पडल्याचे दिसतेय. आता ही दोस्ती कोणत्या कारणानं तुटली, धैर्या आणि ढुंग्या लंडनमध्ये काय करणार, त्यांचे पॅचअप होणार की हे अंतर अधिकच वाढणार, कबीरच्या आयुष्यात पुन्हा ग्रेस येणार? अभिनयची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात मिळणार आहेत. 


हेही वाचा : रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देत गुरमीत चौधरीनं वाचवला जीव; ठरला Real Life Hero


या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, 'यावेळी बॉईज लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. ट्रेलर पाहून याचा अंदाज आला असेलच. खरं सांगायचं तर माझ्यासह माझ्या टीमलाही खूप उत्सुकता लागून राहिली आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि सर्वांना तो आवडतोय. हाच मुख्य हेतू होता, की प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे. 'बॉईज' चा प्रत्येक भाग बनवताना हा पहिलाच भाग आहे, अशा पद्धतीनेच चित्रपट बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळेच कदाचित दरवेळी तो प्रेक्षकांना भावतो. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे शक्य आहे. त्यांनी या 'बॉईज'ना भरभरून प्रेम दिले. शाळेपासून सुरु झालेला 'बॉईज'चा हा प्रवास आता डिग्री कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक नवीन गोष्टीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरवेळी प्रमाणे हा 'बॉईज' ही एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे.'



सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 4'ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय आणि फक्त धमालच वाढली नसून धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज 4' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची ही दमदार टोळी यंदा जबरदस्त धिंगाणा घालणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित, हृषिकेश कोळी लिखित या चित्रपटाचे लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. एखाद्या चित्रपटाचे चार भाग येणे, असे मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच घडत आहे.