रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देत गुरमीत चौधरीनं वाचवला जीव; ठरला Real Life Hero

Gurmeet Choudhary : गुरमीत चौधरीनं केलेल्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानं चक्क एका अनओळखी व्यक्तीचा जीव वाचवला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 6, 2023, 11:28 AM IST
रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला CPR देत गुरमीत चौधरीनं वाचवला जीव; ठरला Real Life Hero title=
(Photo Credit : Social Media)

Gurmeet Choudhary : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरी ही नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गुरमीत चौधरी अचानक रस्त्याच्या कडेला पडलेल्या व्यक्तीला सीपीआर देताना दिसत आहे. आजूबाजूला सगळी गर्दी जमली होती आणि सगळ्यांचे लक्ष गुरमीतनं वेधले आहे. गुरमीतचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

गुरमीतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर वूम्पलानं शेअर केला आहे. या व्हिडीओत गुरमीत हा सेलिब्रिटी असूनही एका सर्वसाधारण व्यक्तीच्या मदतीसाठी थांबला. यावेळी गुरमीत हा डॉक्टरांची किंवा मग अॅम्ब्युलन्सची प्रतिक्षा न करात थेट त्या व्यक्तीला CPR देण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक भावूक झाले आहेत आणि हा व्हिडीओ एक आयओपनर देखील आहे. या व्हिडीओतून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे आणि ती म्हणजे आजकाल आपल्याला CPR आणि बेसिक फर्स्ट एडची माहिती असणं किती महत्त्वाचं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गुरमीत चौधरी तिथे कशाचीही पर्वा न करता CPR देत होता. तर दुसरीकडे त्याच्या आजुबाजुला असलेले लोक हे फक्त त्याच्याकडे पाहत होते आणि व्हिडीओ काढत होते. त्यावेळी गुरमीत हा बोलताना दिसतोय की कोणी तरी त्याचे पाय घासा. काही क्षणात त्या व्यक्तीला शुद्ध आली आणि त्याचे प्राण वाचले. त्या व्यक्तीला शुद्ध येताच तिथे उपस्थित लोक गुरमीतची स्तुती करू लागले होते. तिथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं गुरमीतचे आभार मानले. 

हेही वाचा : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा बायोपिक लवकरच पडद्यावर, कोण साकारणार भूमिका?

गुरमीतचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सगळ्यांना CPR कसा देतात हे माहित असणं गरजेचं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'त्या व्यक्तीला वाचवायला स्वत: श्रीराम आले आहेत.' तिसरा नेटकरी बेसिक फर्स्ट एडविषयी बोलताना म्हणाला की 'अमेरिकेत बेसिक फर्स्ट एड हा त्यांच्या शिक्षणाचा एक भाग आहे. भारतात असं का नाही?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'गुरमीत भाऊ तुझे आभार... तुझ्याविषयी आणखी आदर वाढला आहे. तुझा प्रमाणे मुंबईतील सगळ्या लोकांनी अशीच एकमेकांना मदत केली तर आपला देश नक्कीच पुढे जाईल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'गुरमीत चौधरी तू खऱ्या आयुष्यातील हीरो आहे.'