शाहरुख खान साकारणार वानराची भूमिका? हीरो नाही म्हणून...
शाहरुख साकारणार वानराची भूमिका...
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख हा सगळ्यात शेवटी 'झीरो' या चित्रपटात दिसला. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर शाहरुखला पाहिजे तशा भूमिका मिळाल्या नाही किंवा त्यानं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला, अशा चर्चा सुरु होत्या. लवकरच शाहरुखचा 'पठान' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय शाहरुख 'लाल सिंग चड्ढा', 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला. आता शाहरुख ब्रम्हास्त्र या चित्रपटात पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.
आणखी वाचा : Sussanne Khan च्या ब्रालेट लूकवर Boyfriend अर्सलन गोनी फिदा, पण...
करण जोहर निर्मित 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. करणनं नुकताच या चित्रपटाचा 'वानरास्त्र' या भूमिकेचा टीझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये वानरास्त्रचा चेहरा स्पष्ट दाखवला नाही. तरी देखील याला पाहून चाहते एक्सायटेड आहेत.
आणखी वाचा : रशियन मुलींच्या सौंदर्याचं रहस्य आलं समोर, तरूणी सुंदर केस आणि त्वचेसाठी करतात 'या' पदार्थांचा वापर
KBC 14 : 75 लाख रुपयांच्या या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला शो, तुम्हाला माहितीये का उत्तर?
हा व्हिडिओ शेअर करत करणनं कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वानरास्त्रची सुपर पॉवर अवघ्या 8 दिवसांत समोर येईल. 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चेहऱ्यावर मोठे हसू आलेल्या चाहत्यांना खात्री आहे की हे पात्र शाहरुख खानचे आहे.
आणखी वाचा : तीन लग्न करणारा पवन कल्याण कोट्यवधींचा मालक; राजकारणतही सक्रीय...
एका नेटकऱ्यानं कमेंट करताना लिहिलं की, 'शाहरुख खान, वाह क्या बात है, अप्रतिम हो गया'. दुसरा नेटकरी म्हणाला,'शाहरुख खान अप्रतिम आहे, चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही'. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की शाहरुखला चांगल्या भूमिका मिळत नाही म्हणून तो अशा काही वेगळ्या भूमिका साकारताना ते करत आहे.'