`उर्फी तिचं करिअर घडवतेय, पण लोक अंथरुणात शिरून...`; चेतन भगत यांचा तरुणाईला महत्त्वाचा सल्ला
Chetan Bhagat : इंटरनेटमुळे आमची तरुणाई कमकुवत झालीय असंही चेतन भगतने म्हटलंय
Chetan Bhagat on fashion queen Urfi Javed : सोशल मीडिया (Social Media) हे सध्याच्या तरुणाईच्या जगण्याचे माध्यम बनलं आहे. साध्या मोबाईल पासून झालेला प्रवास सध्या तरी स्मार्टफोन पर्यंत थांबलाय. यासोबत सोशल मीडियाची माध्यमेही बदलली आहेत. इंटरनेटही अगदी कमी पैशांमध्ये उपलब्ध झाल्याने कित्येक तास आजची तरुणाई सोशल मीडियावरच पडून असते. पण त्याचे किती दुष्पपरिणाम होतायच त्या बद्दल त्यांना पुसटशीही कल्पना नाहीये. याबाबतच प्रसिद्ध युवा लेखक चेतन भगत यांनीही चिंता व्यक्त केलीय. आजच्या तरुणाईला पटेल असे उदाहरण देत चेतन भगत यांनी याबाबत भाष्य केलय.
आज तकच्या एका कार्यक्रमात बोलताना चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी आजच्या तरुण पिढीबद्दल आणि फॅशन क्वीन उर्फी जावेदबद्दल (Urfi Javed) भाष्य केले आहे. चेतन भगत हे त्यांच्या लिखाणासाठी तसेच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. या कार्यक्रमात बोलताना चेतन भगत यांनी आजच्या तरुणांना पुस्तके वाचण्याचा सल्ला दिलाय. 'इंटरनेट आणि डेटा ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे आमची तरुणाई कमकुवत झाली आहे. मुलं दिवसभर फोनवर रील बघत बसतात आणि फोटो लाईक करत राहतात,' असे चेतन भगत यांनी म्हटलं आहे.
"तरुणांना उर्फी जावेदचे फोटो आवडत आहेत. पण जर तुम्ही नोकरीसाठी मुलाखतीली गेलात तर काय सांगाल की, मला उर्फीच्या सगळ्या कपड्यांबद्दल माहिती आहे. पण यामध्ये उर्फीची चूक नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. लोक अंथरुणात शिरून उर्फीचे फोटो बघत आहेत. मीसुद्धा आज उर्फीचे फोटो पाहून आलो आहे. आज तिने दोन फोन घातले आहेत. उर्फी जावेदसारखे लोक भेटत राहतात आणि त्यावर गोष्टीही तयार होत राहतात," अशा शब्दात चेतन भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
"तरुणांना चांगल्या दिशेने नेणे हाच माझा उद्देश आहे. वाचन ही एक सकारात्मक गोष्ट आहे, ज्यामुळे तुमची एकाग्रता वाढते. लोकांना फोनचे व्यसन लागले आहे, जे चांगले नाही," असेही चेतन भगत म्हणाले.