Salman Khan Movie Producer Nazim Hassan: हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'चोरी चोरी चुपके चुपके' या लोकप्रिय हिंदी चित्रपटाचे निर्माते नाझिम हसन रिझवी (Nazim Hassan Rizvi) यांचे निधन झाले आहे. सोमवारी रात्री सोमवारी रात्री मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, नाझिम हसन रिझवी यांना काही आजारांमुळे अंधेरीच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2001 साली नाजिम हसन रिझवी यांचा  'चोरी चोरी चुपके चुपके' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan), प्रिती झिंटा (Preity Zinta) आणि राणी मुखर्जी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. यासोबतच शाहरुख खानही या चित्रपटात पाहुण्या भूमिकेत दिसला होता. लव्ह ट्रॅंगलवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. मात्र आज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 


वाचा: बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीचं का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण 


वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास 


चित्रपट निर्माता नाझिम हसिम रिझवी  (Nazim Hassan Rizvi Health) यांना आजारपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निर्माते नाझिम (Nazim Hassan Illness) गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कधी आणि कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाजिम हे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते, त्यांचे अंत्यसंस्कारही तिथेच केले जाणार आहेत. 


नजीनने या चित्रपटांची निर्मिती केली


सलमान खानच्या 'चोरी-चोरी चुपके-चुपके' या चित्रपटासोबत 'अंडरट्रायल' (2007), 'कसम से कसम', 'लादेन आले रे ले' यांसारखे अनेक चित्रपट नाझिम रिझवी यांनी तयार केले आहेत.  नाझिम यांनी त्यांचा मुलगा अझीम रिझवी याला कसम से कसम या चित्रपटातून लॉन्च केले होते, परंतु या चित्रपटातील मुलाच्या अभिनयाने फारसे लोक आकर्षित झाले नाहीत.