मुंबई : झी मराठी वाहिनीवरील चूकभूल द्यावी घ्यावी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनवा नाईक हिची निर्मिती असलेल्या या मालिकेत सुकन्या कुलकर्णी-मोने, दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शन जाधव, नयना आपटे, सायली पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


काही महिन्यांपूर्वीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राजाभाऊ आणि मालती या जोडप्याची कथा यात दाखवण्यात आलीय. लग्नाला ५० वर्षे उलटून गेल्यानंतरही एकमेकांशिवाय यांचे पान हलत नाही. त्यांची कहाणी मजेशीररित्या पडद्यावर दाखवण्यात येतेय. या मालिकेच्या जागी आता गाव गाता गजाली ही मालिका सुरु होणार आहे.