वरुण धवन आणि समांथाचा Kissing Scene; केमिस्ट्री पाहून नेटकरी थक्क
Samantha Ruth Prabhu and Varun Dhawan Kissing Scene : समांथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांच्यातील Intense किसिंग सीनला पाहून चाहते थक्क
Samantha Ruth Prabhu and Varun Dhawan Kissing Scene : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभूची वेब सीरिज 'सिटाडेल: हनी बनी' नुकतीच प्रदर्शित झाली आहे. नुकतीच अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या सीरिजमध्ये वरुण आणि समांथानं केलेल्या अभिनयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यासोबत जर कोणत्या गोष्टीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे तर ते म्हणजे वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभूमध्ये असलेल्या केमिस्ट्रीनं. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.
'सिटाडेल: हनी बनी' या सीरिजमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू लिपलॉक करताना दिसत आहेत. दोघांच्या किसिंग सीननं इंटरनेटवर एकच चर्चा सुरु केली. लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे.
एक नेटकरी व्हिडीओ शेअर करत समांथाच्या हॉटनेसवर म्हणाला, समांथा रुथलेस प्रभू आणि त्यासोबत फायर इमोटीकॉन देखील शेअर केले आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, संपूर्ण सीरिजमध्ये फक्त याच सीनमध्ये समांथा दिसते का? तिसरा नेटकरी म्हणाला, काय रोमॅन्टिक सीन आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, समांथा आणि वरुणची केमिस्ट्री खूप सुंदर आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, वरुण आणि समांथानं या सीरिजमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, त्यांच्यातील केमिस्ट्री ही खूप सुंदर आहे. अशा प्रकारे अनेकांनी या सीनवर रिअॅक्शन दिली आहे.
हेही वाचा : 'तुला दोन आई आहेत ना?' ईशा देओलला चौथी असताना मैत्रिणींनी विचारलेला प्रश्न; स्वत: खुलासा करत म्हणाली...
दरम्यान, या सीरिज विषयी बोलायचे झाले तर याचे दिग्दर्शन राज अॅन्ड डीकेनं केलं आहे. यात वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यात सीरिजमध्ये दोघे कलाकार अॅक्शन करताना दिसले आहेत. तर अॅक्शन आणि सस्पेंसनं भरलेल्या या सीरिजमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की वरुण धवन हा चित्रपटांमध्ये अभिनेत्याच्या बॉडी डबलचं काम करतो. त्यावेळी त्याची भेट ही अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत असलेली अभिनेत्री हनीशी होती. तर वरुण धवन तिला काम मिळून देण्यास मदत करतो. यावेळी हनीला 20 मिनिटं एका व्यक्तीला बोलण्यात गुंतवूण ठेवायचं असतं पण ती यावेळी एका ट्रॅपमध्ये अडकते. तर या सीरिजचे 6 एपिसोड आहेत.