बर्लिन :  आपल्या जर्मन भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गोड सरप्राईजही मिळालं, त्यांची चक्क प्रियंका चोप्राशी अचानक भेट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका सध्या आपल्या बेवॉच या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी जर्मनीमध्ये गेली आहे. पंतप्रधान बर्लिनमध्ये असताना त्यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून प्रियंकाची भेट घेतली. 


प्रियांकानं स्वतःच ट्विटरवर मोदींसोबतचा फोटो शेअर केलाय. एकाच वेळी बर्लिनमध्ये असणं हा छान योगायोग असल्याचं प्रियंकानं म्हटलं आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळात वेळ काढून भेट दिल्यामुळे प्रियंका चोप्राने नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.