मुंबई: सोशल मीडियाचे जग कोणाचे नशीब कधी पालटवेल आणि कोणाला रातोरात स्टार बनवेल याचा नेम नाही. आपल्या धमाकेदार डान्सने  सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेले आणि त्यानंतर मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरलेले 'डांन्सिंग अंकल' अर्थात संजीव श्रीवास्तव हे लवकरच एका हटके स्टाईलमध्ये दिसणार आहेत. श्रीवास्तव यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करून त्याची माहितीही चाहत्यांना दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टीव्हीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवणारे 'डान्सिंग अंकल' लवकरच एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात डेब्यू करत आहेत. या शॉर्टफिल्मची माहिती देण्यासाठी त्यांनी फिल्मची लिंकही ट्विटरवर शेअर केली आहे.


'डांन्सिंग अंकल'नी काढले युट्युब चॅनल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डांन्सिंग अंकल'च्या शॉर्ट फिल्मचे नाव आहे- 'कॉलेज अॅडमिशन अॅण्ड डॅड', या शॉर्टफिल्मची सुरूवात व्हॉईसओव्हरने होते. काही काळ व्हॉईसओव्हर ऐकू येतो आणि त्यानंतर थेट होते ती 'डांन्सिंग अंकल'ची एण्ट्री. त्यांची एण्ट्री होताच शॉर्ट फिल्मला एक वेगळे वळण मिळते. दरम्यन, गेल्याच महिन्यात डांन्सिंग अंकलचा एक हटके व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहून डांन्सिंग अकलेच अनके व्हिडिओ नंतर आले आणि प्रसिद्धही झाले. ही प्रसिद्धी पाहून त्यांनी आपले युट्युब चॅनलही लॉन्च केले.



'डांन्सिंग अंकल' इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक


मुळचे मध्य प्रदेशचे असलेले डांन्सिंग अंकल अर्थातच संजीव श्रीवास्तव हे इलेक्ट्रॉनिक विषयाचे प्राध्यापक आहेत. ते गोविंदाचे फॅन असून, गोविंदाच्या खास डान्स स्टेप केल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. मध्यंतरी त्यांना बॉलिवूडमधू ऑफर आल्याच्याही बातम्या आल्या होत्या. दरम्यान, श्रीवास्तव सध्या एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.