Maharashtrachi Hasya Jatra Datta More : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये असलेले सगळ्याच कलाकारांना वेगवेगळी ओळख मिळाली. त्यापैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तू मोरेनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. इतकंच नाही तर तो जिथे राहतो त्या चाळीला आता दत्तू चाळ अशी ओळखही मिळाली. आता त्या चाळीतून दत्तू लवकरच आलिशान फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे. त्यासोबतच त्याच्या पत्नीचं स्वत: च एक क्लिनीकही सुरु झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दत्तूनं याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. दत्तूची पत्नी स्वाती घुगानेनं ठाण्यात तिचं पहिलं क्लिनिक सुरु केलं आहे. त्यासाठी तिला शुभेच्छा देत त्यानं खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत दत्तूनं कॅप्शन दिलं की "आयुष्य कितीही कठीण दिसत असलं तरी असं काही असतंच जे तुम्ही करु शकता आणि त्यात यशस्वी होतो... घुनागे हॉस्पिटलनंतर .. बायकोच ठाण्यातल पाहिलं क्लिनिक... अजून एक नवीन सुरूवात... प्रिय बायको, तुला खूप खूप शुभेच्छा...आणि खूप खूप प्रेम..." स्वाती ही स्त्री रोग तज्ञ आहे.



हेही वाचा : 'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम!


दरम्यान, त्याशिवाय दत्तूसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे त्याचं आता स्वत: चा आलिशान फ्लॅट असणार आहे. त्याला म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या घरांच्या लॉटरीमध्ये घर लागलं आहे. या लॉटरीत दत्तूचं नशिब फळफळलं आणि त्याला दोन घरं लागली आहेत. रौनक ब्लिझ आणि हायलँड स्प्रिग या दोन प्रकल्पात दत्तूला घर लागलं आहे. दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत दत्तून चाळ सोडण्याच्या त्याच्या भावना व्यक्त करत सांगितलं की "मला पहिल्याच प्रयत्नात म्हाडाचं घर लागलं याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्याच कारण म्हणजे चाळीत राहताना टोलेजंग इमारती बघून माझंही इतरांसारखंच फ्लॅटमध्ये घर हवं असं स्वप्न होतं. आता अखेर ते स्वप्न पूर्ण होत आहे. मात्र, चाळीत लहानाचा मोठा झाला असल्यानं आता फ्लॅट संस्कृतीत मी किती रमेन माहित नाही. चाळीबाबत माझ्या मनात काय आत्मियता राहील." दत्तू आणि स्वाती गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकले होते. त्यांची लव्ह स्टोरी देखील फार हटके आहे.