'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम!

Jhalak Dikhhla Jaa 11 Runner Up Shoaib Ibrahim : 'झलक दिखला जा 11' या शोचा विजेता ठरला नसला तरी या अभिनेत्यानं केली बक्कळ कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Mar 3, 2024, 04:44 PM IST
'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम! title=
(Photo Credit : Social Media)

Jhalak Dikhhla Jaa 11 Runner Up Shoaib Ibrahim : 'झलक दिखला जा 11' या शोचा आज ग्रॅन्ड फिनाले म्हणजेच अंतिम एपिसोड आहे. त्यावेळी शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात येईल. या यादीत टॉप 5 च्या लिस्टमध्ये शोएब इब्राहिम, मनीषा रानी, अद्रिजा सिन्हा, श्रीरामा चंद्र आणि धनश्री वर्मा सहभागी होते. ट्रॉफीसाठी त्यांच्यात खूप मोठी लढाई असेल असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, विजेत्याचं नाव आधीच लिक झालं आहे आणि या सीझनची विजेता मनीषा राणी आहे. ट्रॉफी जरी तिला मिळाली असली तरी टॉप 3 मध्ये शोएब आणि अद्रिजाला हरवलं आहे. शोएब हा या शोमध्ये रनर अप राहिला आहे. तो विजेता ठरला नसला तरी त्याला खूप चांगलं मानधन मिळालं आहे. 

'झलक दिखला जा 11' शोकडून किंवा कुठेही ही बातमी समोर आलेली नाही की शोएब हा फर्स्ट रनर अप आहे की सेकेंड रनर अप. तर ही माहिती आता लवकरच एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. मात्र, या सीझनमधील स्पर्धकांनी आणि परिक्षकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रिपोर्ट्सनुसार, शोएबनं एका आठवड्यासाठी 5 लाख असं मानधन घेतलं. शोमध्ये शोएब एकूण 17 आठवडे होता आणि दोन एपिसोड प्रत्येक एपिसोडला प्रदर्शित झाला होता. अशा प्रकारे त्यानं या सीझनमध्ये 85 लाख कमावल्याचे म्हटले जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मनीषा राणीनं 'झलक दिखला जा 11' मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली. रिपोर्ट अशी आहे की प्रत्येक आठवड्याला 4-5 लाख रुपये मानधन मिळायचं. शोमध्ये ती कमी आठवडे असली तरी तिला शोएब पेक्षा कमी मानधन मिळालं. आज या शोचा फिनाले आहे. मनीषाला ट्रॉफी मिळाल्यानंतर मिळालेली रक्कम ही 30 लाख रुपये आहे. तर तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवार 10 लाख रुपये मिळाले. त्याशिवाय त्या दोघांना दुबईच्या जवळ असलेल्या आयलॅन्डला ट्रिप देखील मिळाली आहे. मनीषाला खरी ओळख ही 'बिग बॉस ओटीटी 2' मुळे मिळाली. 

हेही वाचा : 'हनुमान' फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारनं आर्ट गॅलरिस्टशी केला साखरपुडा!

या शोचं सुत्रसंचालन करत असलेल्या गौहर खान आणि ऋतविकची ऑफस्क्रीन केमेस्ट्री देखील लोकांना प्रचंड आवडते. या शोचे सुत्रसंचालन मलायका अरोरा, फराह खान आणि अरशद वारसी.