मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या 'गहराइया' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा पूर्णपणे रिलेशनशिप भोवती फिरताना दिसत आहे. 'गहराइया' सिनेमा अनेकांनच्या पसंतीस उतरला नाही. पण काहींना सिनेमा प्रचंड आवडला. एकदंर सिनेमाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाला प्रेम आणि प्रेमात मिळालेल्या धोक्याबद्दल अनेकांकडून प्रश्न विचारण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर दीपिकाने मोकळेपणाने उत्तरं दिली. दीपिकाला 'प्रेमात मिळालेला धोका आता तुझ्यासाठी मोठी गोष्ट आहे?' यावर तिने दिलेलं उत्तर तरुणांसाठी फार महत्त्वाचं आहे. 



दीपिका म्हणाली, 'प्रेम आणि मिळालेला धोका या गोष्टी माझ्या खासगी आयुष्यात फार महत्त्वाच्या नाहीत. पण मी कोणत्या ही नात्याबद्दल पूर्वग्रह बांधत नाही... रिलेशनशिप पूर्णपणे जोडीदारासोबत असलेल्या संबंधांवर अवलंबून असते.'


दीपिका पुढे म्हणते, 'जर तुमच्या नात्यात विश्वास नसेल तर, ते नातं फार काळ टिकत नाही. किंबहुना आपलं मन देखील त्या नात्यात रमत नाही. ' रिलेशनशिपमध्ये मिळालेला धोका मानसिक असो किंवा शारीरिक  तो आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.


रिलेशनशिपमध्ये मिळालेला मानसिक धोका आयुष्यात अनेक गोष्टींना नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे आपण सतत त्याचं गोष्टींचा विचार करतो आणि त्याचा परिणाम आपल्या  कामावर होतो. असं मत दीपिकाने यावेळी व्यक्त केलं.