मुंबई : दीपिका आणि रणवीर ही बॉलिवूडची सर्वात लाडक्या जोडीपैकी एक आहे. अनेकदा हे कपल आपलं एकमेकांवरील प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत असतात. अनेकदा त्यांचे पार्टीतले, एअरपोर्टवरचे किंवा इव्हेंटमधले व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात आणि ते व्हायरलही होतात. नुकताच या जोडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत दीपिकाने या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे की, ''त्यांच म्हणणं आहे की, एका एक्टरसाठी सगळ्यात कठिण जॉनर हा कॉमेडी हा आहे.  त्यामुळे जेव्हा मला 'चेन्नई एक्स्प्रेस' ऑफर करण्यात आली, तेव्हा मला माहीत होतं की, माझ्यासमोर एक कठीण आव्हान आहे. तेव्हा   आणि मीनम्मा शोधण्यात मला थोडा वेळ लागला, एक अशी प्रक्रिया होती की, मी एकटी पडले होते हे  अनेकदा भयावह आहे, मी आभारी आहे की, आम्ही एक असं पात्र बनवण्यात सक्षम झालो जो केवळ चित्रपटाचा पर्याय आहे. त्याचसोबत असंही आहे. जे कायम आहे. आज पर्यंत तुमचं खूप प्रेम मिळालं.''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दीपिका रणवीरच्या या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी या गोड व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. दीपिकाच्या व्हिडीओवर रणवीरने कमेंट करत लिहीलंय की, THANGABALi !!!!!!!!!!!! hahaha! Cult stuff! आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिनेमापैकी एक! मीनम्मा म्हणून तुला पाहिल्यावर मी थक्क झालो! हे पात्र तु तुझ्या शैलीत साकारलंस आणि हे तूच करु शकतेस. याच वर्षी मला नैना आणि लीला सापडल्या!  


तर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत एका चाहत्याने म्हटलंय की,दीपिका, चेन्नई एक्स्प्रेसच्या काही झलक तुमच्या स्टोरीवर शेअर कराल का? इतके दिवस झाले!! तर अजून एकाने म्हटलंय, प्रत्येक प्रादेशिक भूमिकेत इतकी प्रभावी दिसणारी अभिनेत्री मी कधीच पाहिली नाही, मग ती पद्मावतीमधील राजस्थानी असो, किंवा चेन्नई एक्सप्रेसमधील दक्षिण भारतीय असो, किंवा रामलीलामधील गुजराती असो की बंगाली. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, रोहित शेट्टी सोबत कोलाब्रेशन पाहण्यासाठी  मी आता जास्त वाट नाही पाहू शकत.  @itsrohitshetty लेडी सिंघम. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते तिच्या या व्हिडिओवर करत आहेत. 


नुकताच चेन्नई एक्सप्रेस या सिनेमाला १० वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमीत्तानेच दिपीका रणवीरने हा व्हिडीओ बनवला होता. या सिनेमाला १० वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.