Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात...
Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : काल रणवीर सिंगचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही त्यामुळे त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटलं आहे.
Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा काल 7 जुलै रोजी 38 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावर रणवीरसाठी एकही पोस्ट शेअर केली नाही. तिच्या या कृतीनं दीपिका आणि रणवीरचे म्हणजेच दीपवीर चाहते नाराज झाले आहेत.
दीपिकानं रणवीरच्या वाढदिवसाच्या एकदिवस आधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यापोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, रणवीरच्या वाढदिवसाच्या दिवशी दीपिका काहीतरी पोस्ट शेअर करेल म्हणून संपूर्ण दिवस तिचं अकाऊंट चेक करत होते. दुसरा नेटकरी म्हणाला, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्तानं काहीतरी पोस्ट शेअर करा. तिसरा नेटकरी म्हणाला, तू तुझ्या नवऱ्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली नाही?
दीपिका आणि रणवीरचे लाखो चाहते आहेत. त्या दोघांना सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येन चाहते फॉलो करतात. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणून दीपवीर ओळखले जातात. या आधी दीपिका आणि रणवीर एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या खास गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करायचे. रणवीर विषयी बोलायचे झाले तर त्यानं 12 मे रोजी दीपिकासाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये रणवीरनं दीपिकाचा टाइम्स मॅग्झिनच्या कव्हर पेजसाठी शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत रणवीर म्हणाला होता की "संपूर्ण जग हे तुझ्यापायाशी आहे. बेबी गर्ल तुझा खूप अभिमान आहे." तर दीपिका विषयी बोलायचे झाले तर तिनं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात 31 ऑगस्ट रोजी रणवीरसाठी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं रणवीरचा एक फोटो शेअर केलसा होता. या फोटोत रणवीरच्या हातात ब्लॅक लेडी आहे. तर हा फोटो शेअर करत "सगळ्यात उत्तम आणि इतरांपेक्षा बेस्ट" असं कॅप्शन तिनं दिलं होतं.
हेही वाचा : तुला Kiss करु का? Huma Qureshi ला 'मास्टर शेफ'च्या परदेशी जजनं विचारलं अन्...; पाहा Video
दरम्यान, दीपिकानं रणवीरला शुभेच्छा दिल्या नसल्या तरी देखील दिग्दर्शक करण जोहरनं रणवीर सिंगला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. करणनं रॉकी और राणी की प्रेम कहाणी या चित्रपटाच्या बिहाइन्ड द सीन चे काही फोटो शेअर केले. हे फोटो करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत "हा रॉकीचा दिवस आहे! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...कहाणीसाठी केलेल्या सगळ्या मेहनतीसाठी धन्यवाद.... रॉकी और राणी की प्रेम कहानी. खूप खूप प्रेम!"
दीपिका आणि रणवीरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'प्रोजेक्ट के' आणि 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. 'प्रोजेक्ट के'मध्ये दीपिका प्रभाससोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर 'फाइटर'मध्ये दीपिका ही हृतिक रोशनसोबत दिसणार आहे.