मुंबई : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh ) हे बॉलिवूडमधील फेव्हरेट कपल. आपल्या कामामुळे हे दोघं कायमच चर्चेत असतात. लग्नानंतर दीपिकाने कुटुंबासोबतच आणखी एक जबाबदारी स्विकारली ती म्हणजे निर्मात्याची. दीपिकाने लग्नानंतर '83' या सिनेमाची निर्मिती केली असून आता ती एका नवी प्रोजेक्टमध्ये निर्मात्याची भूमिका साकारणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक करण जोहरसोबत दीपिकाने सिनेमाची सहनिर्मिती म्हणून जबाबदारी घेतली आहे. शकुन बत्रा दिग्दर्शित नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणा आहे. या सिनेमात दीपिका मुख्य भूमिकेत असून सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाटी दीपिका करण जोहरसोबत निर्मिती करत आहे. (हे पण वाचा - दीपिकाला 'त्याची'च नशा) 


हा सिनेमा एक "डार्क रोमँटिक ड्रामा' असून दीपिकाला याची कथा प्रचंड आवडली आहे. यामुळे दीपिकाने फक्त अभिनयच नव्हे तर सिनेमाची निर्मिती देखील करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने लग्नानंतर रणवीर सिंहसोबत कबीर खानच्या (83) सिनेमात एकत्र काम केलं आहे. यामध्ये रणवीर सिंह खेळाडू कपिल देवची भूमिका साकारत असून दीपिका पाहुणी कलाकार आहे. या सिनेमाची निर्मिती देखील दीपिकाने केली आहे. इतर कलाकारांप्रमाणे दीपिकाला या सिनेमाच्या निर्मिती करून किती फायदा मिळतो याकडेच साऱ्यांच लक्ष आहे. 



रणवीर सिंह '83' या सिनेमात व्यस्त आहे तर दीपिका पदुकोण 'छपाक' या सिनेमाच्या (Chhapaak) तयारीत व्यस्त आहे. 2020 च्या 10 जानेवारीमध्ये हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. 'छपाक' हा सिनेमा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला असून या सिनेमाची निर्मिती देखील दीपिका मेघना यांच्यासोबत करत आहे. ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असून दीपिका यामध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहे.